Beed News भौगोलिकदृष्ट्या गैरसोयीचा असलेल्या आष्टी तालुक्याचा अहमदनगर जिल्ह्यामध्ये समावेश करावा अशी मागणी आष्टीचे माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अहमदनगर येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर जाहीर सभेत आष्टीचा नगर जिल्ह्यामध्ये समावेश केला जाईल अशी घोषणा केली होती, असे दरेकर यांनी सांगितले.
साहेबराव दरेकर यांनी सांगितले की बाळासाहेब ठाकरे आणि मनोहर जोशी अहमदनगर येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी आम्ही मनोहर जोशी यांना या मागणीचे निवेदन दिले होते. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर घोषणा केली होती. हा विषय कॅबिनेट मीटिंगमध्ये घेण्यात आला होता पण सहा महिने अगोदरच युती सरकारने निवडणुका जाहीर केल्या आणि सरकार बदलले. त्यानंतर मात्र हा विषय कोणत्याही सरकारने गांभीर्यपूर्वक घेतला नाही, असे त्यांनी सांगितले.
ते पुढं म्हणाले की अहमदनगर जिल्हा हा विस्तीर्ण असून या जिल्हाचे विभाजन करण्याच्या हालचाली सुरु आहेत. नगरमधून शिर्डी जिल्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या सोयीचा अहमदरनगर जिल्ह्यामध्ये आष्टी तालुक्याचा समावेश करण्यात यावा अशी तालुक्यातील जनतेची जिव्हाळ्याची मागणी आहे, असे त्यांनी सांगितले.
नगरकरांनो सतर्क रहा! वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसणार…
आष्टी तालुक्याच्या चारही दिशेला अहमदनगर जिल्ह्याची हद्द आहे. तालुक्यातील कडा, धामणगाव, दौलवडगाव, धानोरा, लोणी या गावांसह 50 गावांमधील नागरिकांचे दैनंदिन व्यवहार नगर शहरात चालतात. उत्तरेकडील डोंगरपट्ट्यातील सुमारे 10 ते 15 गावांचा दैनंदिन व्यवहार पाथर्डी येथे होतो तर पूर्वेकडील 18 ते 20 गावे जामखेड येथे व्यवहारासाठी जोडलेले आहेत. उर्वरित दक्षिणेकडील 10 ते 15 गावे माहीजळगाव आणि मिरजगाव या गावांशी संलग्न आहेत.
भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली
बीड हे जिल्ह्याचे ठिकाण असून दून अंतराव आहे केवळ कोर्टकचेऱ्या आणि महसूली विभागाचे आणि जिल्हा परिषद असल्यामुळे शिक्षण आणि इतर विभागांची म्हणजे केवळ शासकीय कामांसाठी बीडला जावे लागते. आष्टी तालुक्यातील पश्चिमेला शेवट्या गावाचे अंतर बीड पर्यंतचे सुमारे 140 किलोमीटर इतके आहे. त्यामुळे कोर्ट कचेऱ्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कामासाठी नागरिकांचे 1 दिवसात काम होत नसल्यामुळे दोन दिवस त्या ठिकाणी त्यांना थांबावेच लागते. या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून भौगोलिक दृष्ट्या जवळ अहमदनगरमध्ये आष्टीचा समावेश करावा, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.