भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली

भाजपचा पुन्हा ‘माधव’ फॉर्म्युला, 48 पैकी 45 जागांसाठी रणनीती आखली

‘Madhav’ equation of BJP in Maharashtra : 2024 साली महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी रंगणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी जोरात सुरू केली आहे. राष्ट्रवादीच्या फुटीचा भाजपला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. दुसरीकडे भाजनेही महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी खास रणनीती आखली आहे.

यासाठी भाजप 80 च्या दशकातील माधव फॉर्म्युला वापरण्याच्या तयारीत आहे. माधव सूत्र म्हणजे मा-माळी, ध- धनगर आणि व- वंजारी. खरे तर महाराष्ट्राच्या राजकरणावर मराठा आणि ओबीसी जातींचा सर्वाधिक प्रभाव असल्याचे दिसून येते. माधव हे ओबीसी समाजात येतात. राज्यात मराठा 31 टक्क्यांहून अधिक आहेत, तर ओबीसीमध्ये 356 पोटजाती आहेत. या दोन्ही समाजांना आपल्या गोटात आणण्याची भाजपची रणनीती आहे.

धनगर समाजाला खूश करण्याचा प्रयत्न
माधव हे ओबीसी समाजातील आहेत. त्यांना खूश करण्यासाठी अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करण्यात आले आहे. बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणाही करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात माधव समीकरण कसे चालते?
खरे तर 80 च्या दशकात भाजपने ओबीसी समाजाला आपल्या गोटात आणण्यासाठी ‘माधव फॉर्म्युला’ आजमावला होता. त्यासाठी पक्षाने ओबीसीमध्ये प्रभावी संख्या असलेल्या माळी, धनगर आणि वंजारी समाजाला खूश ठेवण्यासाठी अनेक निर्णय घेतले होते. रणनीतीचा फायदाही पक्षाला मिळाला.

मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…

आता 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने पुन्हा एकदा माळी, धनगर आणि वंजारी समाजातील लोकांना आपल्या गोटात सामावून घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यादेवी होळकर ठेवण्यामागेही हेच कारण असल्याचे मानले जाते. धनगर समाज अहिल्यादेवी होळकर यांना दैवत मानतो.

किती जागांवर प्रभाव आहे?
या समाजातील बहुतांश लोक बीड, अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, अकोला, परभणी, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात राहतात. त्याचबरोबर राजकीय तज्ञांच्या म्हणण्यानुसार 40 हून अधिक विधानसभा मतदारसंघात या समाजाच्या लोकांची निर्णायक मते असून सुमारे 100 विधानसभा मतदारसंघांवर या समाजाच्या लोकांचा प्रभाव आहे.

मणिपूर का पेटले ? हिंसाचार का आटोक्यात येत नाही ? इनसाइड स्टोरी वाचा…

80 च्या दशकातील माधव फॉर्म्युला
भारतीय जनता पक्ष सामान्यतः उच्चवर्गीय नेतृत्वासाठी ओळखला जातो, परंतु पक्षाची ही प्रतिमा बदलण्यासाठी वसंतराव भागवत यांनी 80 च्या दशकात स्व.गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, पांडुरंग फुंडकर, महादेव शिवणकर आणि इतरांच्या मदतीने (माळी, धनगर, वंजारी) सूत्र आणले.

2014 च्या निवडणुकीपूर्वीही गोपीनाथ मुंडे यांनी या समाजांना मदत करण्याचा प्रयत्न केला होता. निवडणुकीपूर्वी भाजपने धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्याचा फायदाही पक्षाला मिळाला आणि याच सूत्रावर भाजप पुढे जात राहिला.

गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने समीकरण बदलले
2014 च्या विधानसभा निवडणुकीनंतर हे समीकरण जवळपास मोडकळीस आल्याचे दिसून येते. एकेकाळी भाजपने ज्यांच्यासोबत ‘माधव’ हे समीकरण तयार केले होते, त्या माधव समाजातील बहुतांश नेते आता राहिले नाहीत किंवा काहींनी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे.

आंधळा, मुका अन् बहिऱ्या गुप्तहेराची धमाल; ‘अफलातून’ चित्रपटाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद

2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर हे समीकरण पुढे नेण्यासाठी कोणताही मोठा चेहरा उरलेला नाही. सध्या ‘माधव’ समीकरणातील कमकुवतपणा हे भाजपसाठी चिंतेचे प्रमुख कारण राहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे या वंजारी समाजाच्या नेत्या म्हणून पाहिजे जाते. राम शिंदे यांना धनगर समाजाचे नेते म्हणून पाहिजे जाते तर चंद्रशेखर बावनकुळे यांना विदर्भातील ओबीसी नेते म्हणून पाहिले जाते. आता भाजपला वंजारी, माळी, धनगर, कुणबी समाजाची एकत्रित मोट बांधावी लागेल. जुने समीकरण बळकट करण्यासाठी त्यांना इतर मागासवर्गीय जातींना आपल्याशी जोडण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल.

महाराष्ट्रातील ओबीसी राजकारण
राज्यात ओबीसी सुमारे 356 जातींमध्ये विभागले गेले असून त्यांना 19 टक्के आरक्षण आहे. 1931 मधील शेवटच्या जात जनगणनेनुसार, भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 52 टक्के ओबीसी आहेत. महाराष्ट्रातील 40 टक्के लोकसंख्या ओबीसी आहे. यामध्ये तेली, माळी, लोहार, धनगर, कुणबी, वंजारा आणि कुर्मी या जातींचा समावेश आहे.

Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…

भाजपचे ओबीसी राजकारण
मुंबईत भाजपचा उदय 1980 साली झाला, त्यावेळी या पक्षाला ब्राह्मण-व्यापार्‍यांचा पक्ष म्हणत. हळुहळू, पक्षाने अनेक मागासवर्गीय नेत्यांना स्वतःशी जोडले, जे पूर्वी राज्याच्या राजकारणात दुर्लक्षित होते.

या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, छगन भुजबळ, नाना पटोले हे नेते उदयास आले. महाराष्ट्राच्या राजकारणावर नजर टाकली तर येथे 40 टक्के ओबीसी लोकसंख्या असूनही मराठा वर्चस्वाच्या राजकारणामुळे त्यांना विशेष राजकीय स्थान मिळवता आलेले नाही.

त्यामुळेच आजपर्यंत राज्यात एकही ओबीसी मुख्यमंत्री झालेला नाही. 80 च्या दशकात, एकनाथ खडसे आणि गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे ओबीसी चेहरे म्हणून उदयास आले होते. पण आज भाजपकडे ओबीसी प्रवर्गातील एकही मोठा नेता नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube