Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…

Manipur Violence : हल्ला करुन जमावाने मुलींसह महिलांना विवस्त्र केलं, पीडितेने सांगितली आपबिती…

Manipur Violence : मणिपूरच्या महिलांच्या व्हायरल व्हिडिओमुळे देशभरात वातावरण चांगलंच ढवळून निघालंय. सर्वोच्च न्यायालय ते थेट संसदेने या घटनेची दखल घेतली आहे. घटनेतील चार आरोपींना अटकही करण्यात आलीय खरी मात्र, व्हिडिओमध्ये दिसलेल्या दृश्यांनंतर आणि आधीही अनेक गोष्टी घडल्या असून ज्या माध्यमांसमोर प्रभावीपणे आलेल्या नाहीत. व्हिडिओतील पीडित दोन महिला वगळता इतर महिलांना या घटनेची आपबिती माध्यमांना सांगितली आहे.

Parliament Monsson Session : मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज 24 जुलैपर्यंत स्थगित

घटनेतील पीडित महिलेच्या माहितीनूसार, 4 मे रोजी काही लोकांच्या जमावाने गावावर हल्ला केला होता. यावेळी जमावासोबत पोलिसही दाखल झाले होते. हल्ल्यादरम्यान, पोलिसांनी महिलांना गाडीत बसवून गावपासून थोडं दूर नेत रस्त्यात सोडलं होतं. त्याचवेळी तिथं पाच जण होते. पोलिसांनीच आम्हाला जमावाकडे सोपवलं असल्याचं पीडित महिलेने स्पष्ट केलं आहे.

‘सर्वच विरोधी पक्ष नेते सत्तेत; पुढचा नेता ब्लड ग्रुप चेक करून जाहीर करणार’; आघाडीतील गोंधळावर बावनकुळेंचा टोला

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या महिलेव्यतिरिक्त एका 50 वर्षीय महिलेला विवस्त्र केलेलं होतं. सोबतच एक 20 वर्षीय मुलीलाही विवस्त्र केलं होतं. आधी त्यांच्या कुटुंबियांची हत्या केली त्यानंतर जमावातील लोकांना जे करायचं होतं त्यांनी ते केलं होतं . त्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून पळून आलो गेलो होतो.

अमित ठाकरेंच्या एन्ट्रीपूर्वीच नगरमध्ये मनसेची गटबाजी चव्हाट्यावर

या घटनेबद्दल पीडित महिलेच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची माहिती नसून मणिपूरमध्ये इंटरनेट नसल्याने त्याची वाच्यता झाली नाही. ज्या ठिकाणी महिलांना विवस्त्र केलं जात होतं, त्या ठिकाणी अनेकजण होते. त्यातील काही लोकांना आम्ही ओळखू शकतो, त्यातील एकजण भावाचा मित्र असल्याचं पीडित महिलेने सांगितलं आहे.

Manipur Violence : ‘महिलांच्या शोषणाची किंमत…’ मणिपूर घटनेवर आशुतोष राणांचं संतापजनक ट्विट…

दरम्यान, या प्रकरणानंतर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून घटनेतील प्रमुख आरोपी हुइरेम हेरोदास मैतेई असं त्याचं नाव असून तो अवांग लीकाईमधील रहिवासी आहे. पोलिसांकडून फुटेजच्या आधारावर इतर आरोपींची ओळख पटवण्याचं काम सुरु असल्याचं सांगण्यात आलं आहे.

मणिपूर हिंसाचारादरम्यान, दोन आदिवासी महिलांची विवस्त्र धिंड काढल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे राज्यात पुन्हा तणाव निर्माण झाला असून महिलांवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपीचे घर संतापलेल्या जमावाने जाळून टाकले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube