अमित ठाकरेंच्या एन्ट्रीपूर्वीच नगरमध्ये मनसेची गटबाजी चव्हाट्यावर

  • Written By: Published:
अमित ठाकरेंच्या एन्ट्रीपूर्वीच नगरमध्ये मनसेची गटबाजी चव्हाट्यावर

Amit Thackeray In Ahmednagar : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक राजकीय पक्ष आता मोर्चे बांधणी करू लागले आहे. यातच सध्या मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे नगर जिल्हा दौऱ्यावर येणार आहे. दरम्यान नगर शहरात त्यांचे आगमन होण्यापूर्वीच मोठी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र आता याच पोस्टरबाजीवरून पक्षातील अंतर्गत वाद देखील चव्हाट्यावर आला असल्याचे समोर आले आहे. अमित ठाकरे यांच्या आगमनाच्या पोस्टरवर मनसेचे नितीन भुतारे यांना डावलण्यात आले असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळते आहे. दरम्यान पक्ष बळकटीकरणासाठी सरसावलेले अमित ठाकरे यांना प्रथमतः पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्याच मनातील खदखद जाणून घ्यावी लागणार आहे असेच दिसून येत आहे. (Before Amit Thackeray came to ahmednagar, politics in the MNS raised the headache)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष अमित ठाकरे महासंपर्क अभियानाच्या माध्यमातून पक्षाची पूर्णबांधणी करत आहेत. याच पार्श्वभूमीवर अमित ठाकरे हे राज्याच्या अनेक भागांमध्ये जात आहे. यातच शनिवार 22 जुलै रोजी ते नगर जिल्हा दौऱ्यावर आहे. नगर शहरात विविध कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहे . दरम्यान अमित ठाकरे हे नगरमध्ये येणार असल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी शहरभर जोरदार पोस्टरबाजी केली आहे.

शहरातील मुख्य चौकांमध्ये त्यांच्या स्वागताचे फलक हे मोठ्या प्रमाणावर झळकत आहे. मात्र हे सगळं सुरु असताना मनसेची गटबाजी देखील चव्हाट्यावर आली असल्याचे समोर आले आहे. अमित ठाकरे यांच्या शुभेच्छा फलकावरून मनसेचे नितीन भुतारे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान याबाबत बोलताना भुतारे म्हणाले, माझा फोटो नाही याबाबत मला काही बोलायचे नाही मात्र असे घाणेरडे राजकारण सध्या जिल्ह्यात सुरु आहे. यामुळे कार्यकर्ते देखील व्यथित आहे.

https://letsupp.com/maharashtra/manipur-violence-yashomati-thakurs-criticism-of-atul-bhatkhalkar-70379.html

दरम्यान जिल्ह्यातील जे पदाधिकारी असे प्रकार जाणीवपूर्वक करत आहे, याबाबत मी पक्षातील वरिष्ठांशी बोलणार आहे. आजवर मला माझ्या कामामुळे प्रसिद्धी मिळाली आहे. माझ्या प्रसिद्धीमुळेच काहीजणांना त्रास होऊ लागला आहे व यातूनच असे प्रकार समोर येऊ लागले आहे. मात्र या घटनेची पक्षाने देखील दखल घेतली आहे. नाहीतर अशा गटबाजीने पक्षाचे भवितव्य धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

दरम्यान या प्रकाराबाबत मी मनसे प्रमुख राज ठाकरे तसेच मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांची भेट घेऊन झालेल्या प्रकारची माहिती देणार आहे. आज जिल्ह्यात मनसेचे अनेक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर अशा कुरघूड्यांना त्रासले आहे. हे लवकरात लवकर थांबले पाहिजे अन्यथा आपला एकही उमेदवार नगरमधून निवडणून येणार नाही अशी खंत मनसेचे नितीन भुतारे यांनी व्यक्त केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube