आंधळा, मुका अन् बहिऱ्या गुप्तहेराची धमाल; ‘अफलातून’ चित्रपटाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद
Aflatoon: अफलातून या मराठी सिनेमाचा आज प्रदर्शित करण्यात आला आहे. (Aflatoon Marathi Movie) या धमाल विनोदी सिनेमात अतरंगी व्यक्तीरेखा, त्यांचा अफाट आत्मविश्वास आणि गोंधळ वाढवणारे प्रसंग तसेच जबरदस्त उत्स्फुर्त टायमिंग असलेले इरसाल संवाद बघायला मिळणार आहे. १० कोटी रुपयांची फसवणूक झाल्यावर त्याचा उलगडा करण्याची जबाबदारी ३ डिटेक्टीव्ह्जवर सोपवण्यात येते. आणि ते हा गुंता कसे सोडवणार हे बघणं कमालीचं ठरणार आहे.
या अफलातूनचा ट्रेलर सिनेमाबद्दलचे कुतुहल निश्चित वाढवणारा असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही वर्षांपूर्वी ३ बंदर नावाचे हिंदीमध्ये गाजलेले नाटक आपल्याला चांगलच आठवत असेल. त्यामध्ये आंधळा, बहिरा आणि मुका तिघे मिळून एका मुलीची मदत करत असताना दिसून आले होते. यानंतर मराठीमध्ये देखील ऑल द बेस्ट या नाटकामध्ये या तीन पात्रांची मुलीवर इंप्रेशन मारत असल्याची रंजक गोष्ट दाखवण्यात आल्याचे दिसून आले आहे.
आता पुन्हा एकदा अशीच तीन पात्रे गुप्तहेर बनून गुंतागुंत सोडवत असल्याचे दिसून येणार आहे. हा धमाल विनोदी मनोरंजक असा कथेचा ट्रॅक आहे. श्री, आदि आणि मानव ही आंधळा, मुका आणि बहिरा असणारी पात्रे गुप्तहेरगिरी कसे शोधणार आहेत. तसेच श्री, आदि आणि मानव हे तिघेही वास्तव आयुष्यात उस्ताद असतात. ते एका फसवणूक झालेल्या मारिया नावाच्या मुलीला मदत करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत असल्याचे दिसून येत आहेत. त्यांच्या शारीरिक व्यंगांमुळे होणाऱ्या गमती जमतीने आपल्याला आता अफलातून मधून बघायला मिळत आहे.
ते मारियाला मदत करत असल्याचे अफलातून मधून पाहायला मिळणार आहे. अफलातून या सिनेमाचे लेखन परितोष पेंटर याने केले आहे. तसेच दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज, आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी आणि राजीव कुमार साहा यांनी या सिनेमाची संयुक्तपणे निर्मिती केली आहे. सुरेश देशमाने यांनी सिनेमॅटोग्राफी केली आहे, तसेच संकलनाची धुरा सर्वेश परब यांनी सांभाळली आहे.
Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…
संगीतकार कश्यप सोमपुरा हे आहेत. तसेच मंदार चोळकर यांनी लिहिलेल्या गाण्यांना चाली लावल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. यामधील गाणी अवधूत गुप्ते आणि वैशाली सामंत यांनी गायली आहेत. या सिनेमात अभिनेता सिद्धार्थ जाधवसह, कॉमेडियन जॉनी लिव्हर, श्वेता गुलाटी, तेजस्विनी लोणारी, विजय पाटकर, भरत दाभोळकर, परितोष पेंटर, जयेश ठक्कर, जेसी लिव्हर, विष्णू मेहरा रेशम टिपणीस हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत.