मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…

मणिपूर घटनेचे पुण्यात पडसाद! पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी…

Manipur Violence : मणिपूर हिंसाचारावरून देशभरात संतप्त आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोनामध्ये काँग्रेस पक्षाकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. अशातच पुण्यात काँग्रेसकडून ‘मूक’ आंदोलन करीत केंद्र सरकार तथा पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करण्यात आला आहे. तुळशीबाग इथल्या मारुती चौकात काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे.

‘सर्वच विरोधी पक्ष नेते सत्तेत; पुढचा नेता ब्लड ग्रुप चेक करून जाहीर करणार’; आघाडीतील गोंधळावर बावनकुळेंचा टोला

आंदोलनादरम्यान बोलताना, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, गेल्या तीन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. आमचे नेते राहुल गांधी सातत्याने मणिपूरकडे लक्ष द्या, असं सांगत असताना देशाचे पंतप्रधान मात्र, परदेशात फिरून मौज मजा करत होते. मणिपूरमधील प्रत्येक महिला आता प्रत्येक राजकारण्याला शिव्या देत असून पंतप्रधान मोदी यांच्याकडे थोडा जरी आत्मक्लेष असला तर त्यांनी आता राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

मणिपूर का पेटले ? हिंसाचार का आटोक्यात येत नाही ? इनसाइड स्टोरी वाचा…

तसेच मणिपूरमधील दोन जातींमध्ये भांडणं लावून, राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याचा आरोप शिंदेंनी केला आहे. तीन महिन्यापूर्वी सुद्धा तुम्ही तेथील मुख्यमंत्री बदलला असता किंवा राष्ट्रपती राजवट लागू केली असती तरी चाललं असतं मात्र, तसे न करता मणिपूर जळत ठेवायचं. त्याचा राजकीय फायदा घ्यायचा, तिथे घडणाऱ्या सगळ्या बातम्या दाबण्याचं कृत्य पंतप्रधानांकडून केल्याचंही ते म्हणाले आहेत.

‘पुन्हा मोदीच PM बनणार, सीमा एक जासूस’, चिठ्ठी काढत अवध सरकारने सांगितली भविष्यवाणी…

दरम्यान, जनतेच्या रोषासमोर शेवटी कधीही न बोलणाऱ्या पंतप्रधानांना पत्रकारांना एक मिनिट का होईना पण प्रतिक्रिया द्यावी लागली. त्यामुळे याची गंभीरता त्यांना कळाली असेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी काँग्रेसची मागणी असल्याचं शिंदे म्हणाले आहेत. यावेळी काँग्रेस महिला कार्यकर्त्या व अन्य पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.

मणिपूरमधील महिलांच्या व्हायरल व्हिडिओवरुन देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत केंद्र सरकारला फटकारलं आहे. विविध स्तरातील नागरिकांनी निषेध व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्रात या घटनेचे पडसाद उमटत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube