नगरकरांनो सतर्क रहा! वादळी वाऱ्यासह धो-धो पाऊस बरसणार…
अहमदनगरकरांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. आज आणि उद्या जिल्ह्यात विजेच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्कता राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
टीसीला तिकीट विचारणं पडलं महागात! फुकट्या प्रवाशानं दगडाने डोकं फोडलं…
हवामान विभागाच्या अंदाजानूसार 19 जुलैपासून राज्यभरात सर्वत्रच जोरदार पावसाची बॅटिंग सुरु आहे. राज्यातील काही भागांत अतिवृष्टीमुळे दरडी कोसळल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. दरड कोसळल्याच्या घटनेमध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आज 21 जुलै आणि 22 जुलैदरम्यान, अहमदनगरमध्येही जोरदार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
सहकाऱ्यांचे हात धरले,अर्धा डोंगर चढला अन्…; CM शिंदेंनी सांगितला इर्शाळगडावरील ‘आँखो देखा हाल’
जोरदार पावसात नागरिकांनी झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये, वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
तसेच नागरिकांनीा मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्सफॉर्मजवळ थांबू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना नजीकच्या तहसील कार्यालयात किंवा पोलिस ठाण्यात संपर्क साधण्याचं आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.