Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता ढासळत चालली आहे. त्यांना सलाईनद्वारे पाणी व इतर औषधं देण्याचा प्रयत्न डॉक्टरांकडून सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांच्या पत्नीशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या अत्यंत भावनिक झाल्याच्या पाहायला मिळाल्या. त्यांनी मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्या, मला माझ्या धन्याकडे पाहता सुद्धा येत नाही, अशी सरकारकडे भावनिक विनंती केली आहे.
अजितदादांनी वाद टाळला? पुण्यात न येता मंत्रालयात बैठक; सुनिल टिंगरेंना सोबत घेत अधिकाऱ्यांना निर्देश
गेल्या नऊ दिवसांपासून उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या घशाला आणि किडणीला काही प्रमाणात संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे यांच्या पत्नीला त्यांच्या पतीच्या जिवाची काळजी वाटू लागली आहे. त्यांची तब्येत नऊ दिवसांमध्ये चांगलीच खालावल्याची दिसत आहे.
कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा! पहिल्या टप्प्यात 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी…
मनोज जरांगे यांच्या पत्नीने अश्रुंनी भरलेल्या डोळ्यांनी सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची विनंती केली आहे. माध्यमांशी बोलताना देखील मनोज जरांगे यांच्या पत्नीला डोळ्यातील अश्रू आवरता आले नाही. त्या म्हणाल्या की सरकारने त्यांची काळजी घ्यावी. कारण त्यांना पाहण्याची माझी सुद्धा परिस्थिती नाही.
सकाळी मी त्यांना टीव्हीवर पाहिले, ते आता खुपच घायाळ झालेले दिसत आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणावर सरकारने लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पत्नीने केली आहे.