कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा! पहिल्या टप्प्यात 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी…
राज्य सरकारने घोषणा केल्यानूसार आज राज्यातील 3 लाख शेतकऱ्यांना 300 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
PGCIL Recruitment 2023 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी, पगार 27,000 हजार रुपये
राज्यातील काही भागात अतिवृष्टी तर काही भागांत पावसाने पाठ फिरवल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा अर्थिक फटक बसला होता. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 फेब्रूवारीला कांद्यासाठी शेतकऱ्यांना 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता. त्यानूसार पहिल्या टप्प्यात जवळपास 3 लाख कांदा उत्पादकांना 300 कोटी रुपयांचा निधी वितरीत देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता दुसरा टप्पाही लवकरच सुरु करण्यात येणार आहे.
Sharad Pawar यांनी मराठा नसलेल्या ठाकरेंना मुख्यमंत्री कसं केल? राणेंचा सवाल
कांदा अनुदानामध्ये 10 कोटींपेक्षा कमी असलेल्या राज्यातील नागपूर, रायगड, सांगली, सातारा, ठाणे, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, लातूर, यवतमाळ, अकोला, वाशिम या जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या थेट बॅंक खात्यात हे अनुदान जमा होणार आहे. तसेच 10 कोटींपेक्षा अधिक कांदा अनुदानासाठी मागणी असलेल्या नाशिक, उस्मानाबाद, पुणे, सोलापूर,अहमदनगर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, कोल्हापूर, बीड जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंत अनुदान जमा होणार आहे.
दरम्यान, 10 कोटी पेक्षा अधिक मागणी असलेल्या 10 जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची 10 हजार रुपयांपर्यंतची देयक आहेत त्यांना पूर्ण अनुदान मिळणार असून ज्या पात्र लाभार्थ्यांचे देयक 10 हजारांपेक्षा अधिक आहेत, त्या लाभार्थ्यांनाही प्रत्येकी 10 हजार रुपये अनुदान जमा होणार आहे.या शुभारंभादरम्यान,