Jayakwadi Dam : पैठण येथील जायकवाडी जलाशयामध्ये (Jayakwadi Dam ) उत्तर महाराष्ट्रातून पाणी सोडण्यात यावे यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. तसेच मराठवाड्याचे आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण देखील मराठवाड्याच्या पाणी प्रश्नी मैदानात उतरले आहेत.
काय म्हणाले अशोक चव्हाण?
उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडी धरणात (Jayakwadi Dam) पाणी सोडावं हा उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवण्यात आला आहे. त्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, उत्तर महाराष्ट्राच्या धरणांमधून जायकवाडीत पाणी सोडण्याप्रकरणी मा. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे जायकवाडीला 8.6 टीएमसी पाणी सोडण्याचा 20 ऑक्टोबर 2023 रोजीचा गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचा निर्णय कायम आहे.
आज मराठवाड्यामध्ये तीव्र पाणी टंचाई आहे, शेतकरी अडचणीत आहेत, पिकांची परिस्थिती बिकट झाली आहे. शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मराठवाड्याच्या हक्काचे पाणी विनाविलंब सोडण्याचा निर्णय घ्यावा. अशी माझी मागणी आहे. अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.
Ankita Lokhande: सुशांतबद्दल बोलताना अंकिता पुन्हा भावूक; म्हणाली, “मी तर त्याच्या अंत्यविधीलाही..”
दरम्यान जायकवाडीच्या पाण्यासाठी हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली होती. मराठवाडा असोशिएन आणि माजी आमदार कल्याण काळे यांनी जायकवाडी धरणात नाशिक व अहमदनगर मधील धरणातून पाणी सोडावं यासाठी याचिक दाखल केली होती. आता सर्वोच्च न्यायालयात ही सुनावणी पार पडली असून मराठवाड्याला पाणी सोडण्याचा प्रश्न मार्ग मोकळा झाला आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला आहे.
Avneet Kaur : अवनीत कौरचा व्हाईट ड्रेसमध्ये किलर अवतार…
समन्यायी पाणी वाटप धोरण कायद्यानुसार नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून साडे आठ टीएमसी पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणात सोडण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले होते. मात्र नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यात येऊ नये अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली होती.
नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालय एक बैठक झाली होती. या बैठकीत जायकवाडीला पाणी सोडण्यात येऊ नये असा सर्वपक्षीय ठराव झाला होता. मात्र यावरून कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली होती. जायकवाडीला पाणी सोडण्यात यावे अशी भूमिका मराठवाड्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली होती.