Download App

आरोपीला भावाचा सपोर्ट, त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका…, सळईचे चटके दिलेल्या तरूणाचा आरोप

भागवतला त्याच्या भावाने बळ दिलं. म्हणून भागवतची एवढी हिंमत झाली. मी आज हे सगळं सांगतोय, पण त्यांच्यापासून मला धोका आहे.

  • Written By: Last Updated:

Kailash Borade : जालना (Jalna) जिल्ह्यातील भोकरदनमधील आन्वा गावात महाशिवरात्रीच्या दिवशी धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून कैलास बोराडे (Kailas Borade) नावाच्या व्यक्तीला जबर मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला. लोखंडी सळईने चटके देऊन त्यांना अमानुष मारहाण झाली. दरम्यान, आता कैलास बोराडे ((Kailas Borade) यांनी आरोपीला भावाचा पाठिंबा होता असं म्हणत आपल्याला आरोपींपासून धोका आहे, असं म्हटलं.

मुंबईची भाषा मराठीच, ती प्रत्येकांना शिकावी…; चौफेर टीकेंनंतर भय्याजी जोशींचा यू-टर्न 

भागवत दौडने कैलास यांना मारहाण केली. कैलास बोराडे हे दर्शनासाठी मंदिरात गेले होते. त्यावेळी जुन्या वादातून भागवत दौडने कैलासशी वाद घातला आणि रागाच्या भरात कैलासला मारहाण करत तापलेल्या लोखंडी रॉडने चटके दिले. या प्रकरणी पारध पोलिसांनी भागवत दौड आणि त्याच्या भावाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कलम 109 (1) 49,115 (2), 351(2) (3) अन्वये त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.

आरोपींपासून जीवाला धोका…
दरम्यान, आज माध्यमांशी बोलताना कैलास बोराडे म्हणाले की, जुन्या दुश्मनीतून भागवतने मला पार्श्वभागावर चटके दिले. एका महिन्याअगोदर भागवतने रस्त्याच्या मधातून पाईपलाईन केली. त्याबाबत त्याला विचारले असता त्याने अरेरावी केली. माझ्या कानपट्टीतही मारल्या. तुला ठाऊक नाही आम्ही कोण आहोत? जेसीपीने तुला गाडूनच टाकू, अशी धमकी दिली आणि महाशिवरात्रीच्या दिवशी दर्शनाहून येत असतांना मला त्याने गरम रॉडने चटके दिले. भागवतला त्याच्या भावाने बळ दिलं. म्हणून भागवतची एवढी हिंमत झाली. मी आज हे सगळं सांगतोय, पण त्यांच्यापासून मला धोका आहे, असं बोराडे यानी सांगिलतं.

आरोपी भागवत दौंडला भावाचा पाठिंबा…
कैलास बोराडे यांचा भाऊ भगवान बोराडे म्हणाले की, हा सगळा वाद एका महिन्याआधीचा आहे. आमचा वैयक्तिक शेतीचा कोणताही वाद नाही. भागवत दौड हा मेन रोडमधून पाईपलाईन करत होता. तेव्हा कैलासने त्याला हटकले. तर भागवतने गाडून टाकण्याची भाषा केला. मलाही फोन करून तुमच्या बंधूना समजावून सांगा, असं सांगितलं. त्यानंतर त्याने हे कृत्य केलं. आपल्याजवळ पैसा आहे, या गुर्मीतून त्याने हे कृत्य केलं. भागवताला त्याच्या भावाचाही सपोर्ट आहे. भावाच्या सपोर्टसिवाय त्याने हे कृत्य केलंच नाही, असं भगवान बोराडे म्हणाले.

 

follow us