सावधान! पुढील काही दिवस महत्वाचे, उन्हाचा चटका वाढणार

Maharashtra Weather Update Heat Wave Alert IMD Prediction : राज्याच्या तापमानात कालपासून मोठी घट (Weather Update) झालीय. तर पुढील पाच दिवस उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा अंदाज (Heat Wave Alert) आहे. उत्तरेकडून थंड वाऱ्याचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे राज्याच्या तापमानात कालपासून मोठ्या प्रमाणात बदल जाणवतोय. मार्च महिन्याच्या सुरूवातीलाच उष्णतेच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
मागील दोन दिवसांमध्ये पुणे शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झालीये. तापमानात चढ-उतार कायम राहील, असा इशारा हवामान खात्याने दिलाय. पुणे राज्यातील कमाल आणि किमान तापमान घटल्याचं समोर (Maharashtra Weather Update) येतंय. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे हवामानात गारठं पसरलेलं आहे. कोकणासाठी पुढील पाच दिवस महत्वाचे आहेत.
शाळांची उन्हाळी सुट्टी कमी होणार; राज्यात एकाचवेळी परीक्षा, काय परिणाम होणार ?
कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस या ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा यलो अलर्ट आयएमडीने दिलेला आहे. पुण्यामध्ये एकीकडे कमी किमान तापमान नोंदवले जातंय, तर दुसरीकडे वडगावशेरी, मगरपट्टा, कोरेगाव पार्कमध्ये मात्र जास्त तापमानाची नोंद झालीय.
भारतीय हवामान विभागाने 9 आणि 10 मार्च रोजी मुंबई आणि आसपासच्या भागामध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केलाय. त्यामुळे दुपारच्या वेळी बाहेर पडू नका, जास्त पाणी प्या असं आवाहन भारतीय हवामान विभागाकडून करण्यात आलंय. फेब्रुवारी महिन्यातील तापमानापेक्षा या महिन्यात 5 अंश सेल्सिअस जास्त तापमान आहे. या महिन्यात कमाल तापमान 37 ते 38 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.
‘मारहाणीचा व्हिडिओ’ सतीश भोसलेला ओळखतो, पण मीच बॉस….सुरेश धस धक्कादायक बोलले
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची शक्यता आहे. वाढत्या उन्हाच्या चटकांमुळे उष्माघाताचा त्रास जाणवण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी उष्माघातामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची बातमी देखील समोर आली होती. त्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे.