Download App

आरक्षणाचं शून्य ज्ञान अन् त्यावर बोलण्याची लायकीही नाही; हाकेंनी जरांगेंची लायकीच काढली

Lakshaman Hake यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली.

Lakshaman Hake Criticize Manoj Jarange on OBC Reservation : मराठा आरक्षणाविरोधात आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Lakshaman Hake) यांनी उपोषण छेडले असून, आज (दि.21) संध्याकाळी हाके यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत बैठक करणार आहे. त्याअगोदर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगेंची (Manoj Jarange) लायकी काढत सडकून टीका केली. हाके म्हणाले की, जरांगे यांना आरक्षणामधील शून्य टक्के देखील ज्ञान नाही.

वटपोर्णिमेलाच नवऱ्याचा प्रताप! पत्नीला फरफटत नेत भुलीचं इंजेक्शन दिलं अन् ..,

तसेच ते पुढे म्हणाले की, मनोज जरांगे यांना आरक्षणामधील शून्य टक्के देखील ज्ञान नाही. कारण देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्षे पूर्ण झाली. मात्र मंडल आयोग स्थापन होऊन केवळ 27-28 वर्षे झाली आहेत. त्यामुळे जरांगे यांनी ओबीसींना 70 वर्षांपासून आरक्षण असल्याचा जावई शोध कुठून लावला? त्यामुळे जरांगेची माझ्यासमोर बोलण्याची लायकी नाही. मी त्यांना एकेरी बोलत आहे. मात्र माझी चिडचिड होत आहे. कारण ते आमचे ओबीसी चे नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करत आहेत.

Video : भुजबळ, जानकर, मुंडे बंधू बघिनींना टार्गेट कराल तर, गाठ माझ्याशी; हाकेंचं जरांगेंना चॅलेंज

तसेच त्यांना माझा एक प्रश्न आहे की, महाराष्ट्रात 60 टक्क्यांहून अधिक असलेल्या ओबीसींना शंभर टक्के पैकी एक टक्के देखील बजेट राबवण्यात आलेले नाही. कारण मंत्री मुख्यमंत्री आणि आमदार, खासदार हे मराठेच आहेत. त्यामुळे कुणी कोणाचं खाल्लं? तसेच ओबीसींनी आरक्षणाचा फायदा घेतला असा तर त्यांचे 400 कारखाने दिसले असते. राज्यातील 100 सहकार्याने शंभर खाजगी साखर कारखान्यांपैकी केवळ दहा-पंधरा कारखाने सोडले तर 90% कारखाने हे फक्त मराठा समाजाचे आहेत. असा सवाल हाके यांनी केला आहे.

follow us

वेब स्टोरीज