Video : भुजबळ, जानकर, मुंडे बंधू भगिनींना टार्गेट कराल तर, गाठ माझ्याशी; हाकेंचं जरांगेंना चॅलेंज

  • Written By: Published:
Video : भुजबळ, जानकर, मुंडे बंधू भगिनींना टार्गेट कराल तर, गाठ माझ्याशी; हाकेंचं जरांगेंना चॅलेंज

जालना : मराठा आरक्षणाविरोधात आणि ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणार्थ ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषण छेडले असून, आज (दि.21) संध्याकाळी हाके यांचे शिष्टमंडळ राज्य सरकारसोबत बैठक करणार आहे. या बैठकीत तोडगा निघून हाके त्यांचे उपोषण सोडणार का? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. मात्र, या बैठकीपूर्वी लक्ष्मण हाके यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जरांगेंचा एकेरी उल्लेख करत त्यांचे ज्ञान काढले. तसेच भुजबळ, जानकर, मुंडे बंधू आणि भगिनींना तसेच पडळकरांना टार्गेट केलं तर गाठ माझ्याशी आहे असं थेट चॅलेंज दिले आहे. जरांगेंची माझ्याशी बोलायची लायकी नसल्याचेही हाके म्हणाले. (Laxman Hake Press)

काय म्हणाले हाके?

जरांगेंना आरक्षणाबाबत शून्य टक्के ज्ञान असून, पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसी एकत्र झाला. तर जरांगे तुम्ही राजकारण नावाची गोष्ट विसरून जाल असे हाके म्हणाले. त्यामुळे त्यांनी आरक्षणावर बोलण्याआधी त्यासंबंधीचा अभ्यास वाढवावा असा सल्लाही हाके यांनी जरांगेंना दिला. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्यांनी व्हावे शुभेच्छा आहेत असा टोला देखील हाकेंनी लगावला. यावेळी हाकेंनी जरांगेंनीच बीड शहर जाळलं असा गंभीर आरोप केला. एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ-भाऊ अशी कुटनीती बंद करा. त्यामुळे भुजबळ, मुंडे बंधू आणि बघिनी तसेच गोपीचंद पडळकर आणि महादेव जनकर यांना टार्गेट करणं बंद करा. हा लक्ष्मण हाके तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर द्यायला तयार असेल असे थेट सांगितले.

निवडणुकांसाठी समाजाचा बट्ट्याबोळ करू नका

यावेळी हाकेंनी राजकाण्यांनाही खडेबोल सुनावले, ते म्हणाले की, नेत्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी समाजाचा बट्ट्याबोळ न करण्याचे आवाहन त्यांनी केले. जरांगे आणि त्यांचे सल्लागार नेहमी शरद पवार यांचा विरोध करत आले. जरांगेंनी नेहमी ओबीसींच्या नेत्यांना टार्गेट केलं. भुजबळ तुम्ही लय खाल्लंय असे ते म्हणतात. ओबीसींनी रिझर्वेशन खाल्ल असत तर, ओबीसींचे चारशे कारखाने दिसले असते. तुम्ही फक्त एका जातीची भाषा बोलताय त्यामुळे नक्की जातीवादी कोण? असा सवाल हाकेंनी जरांगेंना केला.

राजकीय ओळख उध्वस्त करायला जनता आहे

यावेळी हाकेंनी राजकीय ओळख उध्वस्त करायला जनता तयार आहे ना , तू कोण जरांगे असे म्हणत  जरांगे तुम्ही थोडी आरक्षण पॉलिसी समजून घ्या असा सल्ला दिला. मंडल आयोग सहजासहजी आलेला नसून, या देशामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांची जनतेने जिरवली आहे.अटलबिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांचा देखील पराभव झाला आहे. त्यामुळे तू कुठला कोण लोकशाहीमध्ये धमक्या देऊ नका असे हाकेंनी म्हटले.

बातमी अपडेट होत आहे…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज