वटपोर्णिमेलाच नवऱ्याचा प्रताप! पत्नीला फरफटत नेत भुलीचं इंजेक्शन दिलं अन् ..,

वटपोर्णिमेलाच नवऱ्याचा प्रताप! पत्नीला फरफटत नेत भुलीचं इंजेक्शन दिलं अन् ..,

Pune Crime News : पुण्यातील पिंपरी चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) वटपोर्णिमेच्या (Vat Purnima) दिवशीच नवऱ्याच्या प्रतापाची संतापजनक घटना समोर आलीयं. आपल्या पत्नीला ऑफिसमधून फरफटत आणून गाडीत बसवत भुलीचं इंजेक्शन देत डांबून ठेवल्याचा प्रकार घडल्याचं समोर आलायं. या प्रकारातून पत्नीने कशीतरी सुटका करुन घेत थेट वाकड पोलिस ठाणे गाठून पतीविरोधात गुन्हा दाखल केलायं.

Heat Wave In India : 110 मृत्यू, 40 हजारांहून अधिक नागरिकांना स्ट्रोक; काळजी वाढवणारी माहिती समोर

नेमकं काय घडलं?
सुमित शहाणे असं या पतीचं नाव असून या दोघांचाही विवाह ऑगस्ट 2023 मध्ये झाला. लग्नानंतर पुण्यातील मंचरमध्ये हे दाम्पत्य राहत होतं. लग्नाच्या आठवड्यानंतरच पतीने पत्नीकडे नको त्या मागण्या सुरु केल्याने पत्नीने पतीपासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पत्नी आपल्या मुंबईतील मैत्रीणीकडे काही दिवस राहिली. पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे तिला नोकरी मिळाल्यानंतर तिने पुण्यात येऊन नोकरी करण्याचं ठरवलं.

आपली पत्नी पुण्यातच नोकरी करीत असल्याची माहिती पती सुमितला मिळाली. त्याने पत्नीच्या ऑफिसचा पत्ता शोधून काढत थेट ऑफिस गाठलं. 19 जून रोजी सुमित, आई आणि वाहनचालकासोबत वाकड परिसरात आला. त्याने पत्नीच्या ऑफिसमधून तिला फरपटत गाडीत बसवलं. याचदरम्यान पत्नीचा मित्रही जबरदस्तीने गाडीत बसला. मात्र, गाडी मंचरच्या दिशेने निघाल्यानंतर पत्नीच्या मित्राला पतीने गाडीतून बाहेर ढकलून दिले. पुढे सुमितने पत्नीला भुलीचं इंजेक्शन दिलं.

पुण्यातील आठ जागांचा तिढा सुटला? महायुतीला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीचा मोठा डाव

पत्नीला गाडीत जबरदस्तीने बसवून भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर त्याने तिला घरी न नेता गाडीतच डांबून ठेवलं. त्यानंतर जेव्हा, जेव्हा पत्नी शुद्धीवर येत असत तेव्हा तेव्हा सुमित पत्नीला वारंवार भुलीचं इंजेक्शन देत असल्याचा आरोप पत्नीने केलायं.

पत्नीची सुटका झाली कशी?
19 जून रोजी सुमितने आपल्या पत्नीला गाडीतच डांबून ठेवलं. त्यानंतर पत्नीला जेव्हा जेव्हा शुद्ध यायची तेव्हा तेव्हा सुमितने पत्नीला भुलीचं इंजेक्शन दिलं. दुसऱ्या दिवशी 20 जूनला पत्नीने सुमितला विश्वासात घेत मी कागदपत्रांवर सही करायला तयार असल्याचं पत्नीने सांगितलं. त्यानंतर सुमितने गाडी मंचर परिसरात आणली, तेव्हा अद्याप मला पूर्ण शुद्ध नाही, असं सांगत पत्नी आणि सुमित एका मंदिरातच थांबून राहिले. त्याचवेळी पत्नीने एका तरुणास खुनवत मदत पाहिजे, असल्याची मागणी केली. तरुणाला काहीतरी गडबड असल्याचं दिसताच त्याने मंचर पोलिसांना मंदिरात बोलावून घेतलं. पोलिस मंदिरात आल्यानंतर पत्नीची सुमितच्या तावडीतून सुटका झाली.

दरम्यान, पत्नीने पती सुमित, आई, आणि चालकावर अनेक आरोप केले आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज सकाळच्या सुमारास पत्नीने वाकड पोलिस ठाणे गाठत जबाब दिला असून पती, आई, अन् चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube