Latur Earthquake : मागील काही दिवसांपासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. अनेकांचे पिके, जमीनी अक्षरश: वाहून गेले आहेत. हातातोंडाशी आलेली पिके गेल्याने शेतकऱ्यावर मोठं अर्थिक संकट कोसळलंय. अशातच आता लातूरला भूकंपाचे धक्के (Earthquake) बसले आहेत. लातूरच्या मुरुड भागात मध्यरात्रीच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के बसल्याने लोकांनी घरातून पळ काढलायं.
लातूरच्या मुरुड अकोला परिसरात रात्री 8 वाजून 13 मिनिटांनी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 2.3 रिश्टर स्केल असल्याची नोंद झालीयं. या भूकंपाचा केंद्रबिंदू हा लातूर शहराच्या पश्चिम बाजूला असलेल्या मुरुड अकोला परिसरात आहे.
“स्पंदनं” जागवणारा स्व-बळाचा ‘विजय’ वीणा जामकरची “कुर्ला टू वेंगुर्ला” च्या दिग्दर्शकासाठी खास पोस्ट
लातूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीच्या पिकांचं प्रचंड मोठं नुकसान झालंय. या अतिवृष्टीमुळे नदीकाठची शेती पिके संपूर्ण पाण्यात वाहून गेली आहेत. लातूरच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. ते औसा तालुक्यातील उजनी ठिकाणच्या पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.