Latur News : लातूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात 30 ते 35 विद्यार्थींनीना विषबाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. जेवणातून या विद्यार्थीनींची प्रकृती खराब झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या विद्यार्थीनींना तत्काळ येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
जेवणातून विषबाधा होत असल्याच्या घटना वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील जांभोरा गावात एका कार्यक्रमात अशीच घटना घडली होती. जेवणासाठी तयार करण्यात आलेल्या भाजीत अचानक पाल पडली. पाल पडल्याचे कुणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे हीच भाजी जेवणात वाढण्यात आली. हीच भाजी लोकांनी खाल्ली. त्यामुळे या सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Latur News : लातुरात खळबळ.. काँग्रेस नेत्याच्या घरात भावाने संपविले जीवन; पोलीस घटनास्थळी
या घटनेनंतर लातूर जिल्ह्यात विषबाधेची घटना उघडकीस आली आहे. शहरातल्या औसा रोड भागात असणाऱ्या एका सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयात ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या महाविद्यालयाच्या वसतिगृहात तीनशेपेक्षा जास्त विद्यार्थिनी राहतात. शनिवारी रात्री सर्वांनी जेवण केले. यानंतर मात्र अनेकांना मळमळ, चक्कर, उलटी असे त्रास जाणवू लागले. जवळपास 30 ते 35 विद्यार्थिनींची प्रकृती खालावली.
वसतिगृहातील 30 ते 35 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर काही जणांकडून हा आकडा जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नेमक्या किती विद्यार्थिनींनी विषबाधा झाली याचा आकडा समोर आलेला नाही. वसतिगृहातील कर्मचाऱ्यांनी तातडीने ही माहिती वरिष्ठांना कळवली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली.
या विद्यार्थीनींना तत्काळ येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर या सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून पालक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. वसतिगृहातील जेवणाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
धक्कादायक! जेवणाच्या भाजीत पाल, तीच भाजी लोकांच्या पोटात; भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
दरम्यान, याआधी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विषबाधा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना ऑगस्ट महिन्यात समोर आली होती. यामध्ये विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा 257 वर गेला होता. (Sambhajinagar) त्यातील सात विद्यार्थ्यांची तब्येत खालावली होती. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला नेण्यात आले होते.