पवारांसोबत असतांना विलासरावांचा फोन, जयंत पाटलांना सांगितला ‘तो’ किस्सा

Jayant Patil : आज लातूर तालुक्यातील निवळी येथे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil यांनी या कार्यक्रमात बोलतांना विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा पवार साहेबांसोबत असतांना विलासरावांचा फोन आल्याचा किस्साही […]

Jayant Patil

Jayant Patil

Jayant Patil : आज लातूर तालुक्यातील निवळी येथे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतेही उपस्थित होते. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil यांनी या कार्यक्रमात बोलतांना विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. एकदा पवार साहेबांसोबत असतांना विलासरावांचा फोन आल्याचा किस्साही जयंत पाटलांनी सांगितला.

Rohit Pawar : ‘शेतकऱ्यांचा नाही, बड्या व्यापाऱ्यांचाच फायदा’; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल 

विलासराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना जयंत पाटील हे विलासराव देशमुखांबद्दल भरभरून बोलले. पाटील म्हणाले, विलासराव देशमुख असते तर काँग्रेस आज अधिक संपन्न, अधिक ताकदवान झाली असती. महाराष्ट्रात एकेकाळी काँग्रेस मजबूत होती, ती विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वामुळेच आहे, असे मी आजही मानतो, असं पाटील म्हणाले.

Ritesh Deshmukh : “काका नेहमीच पाठिशी उभे राहिले, काका-पुतण्याचं नातं”… रितेशचं वक्तव्य चर्चेत 

विलासराव देशमुख यांचे निधन होऊन बरीच वर्षे झाली, मात्र उपस्थित जनतेच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांचे स्थान आजही लोकांच्या हृदयात कायम असल्याचे सिद्ध होते. लोक एखाद्या व्यक्तीला त्यांच्या चांगल्या कामासाठी लक्षात ठेवतात. विलासराव देशमुखांनी मराठवाडा आणि संपूर्ण राज्यासाठी विस्तृत काम केलं. आटप्पाडी साखर कारखान्याच्या उद्घाटनप्रसंगी ते उपस्थित होते. तेव्हा मी त्यांचे भाषण प्रथमच ऐकले. राजकारण्याने कसे भाषण करावे, हे विलासरावांकडून शिकले पाहिजे, असं पाटील म्हणाले.

यावेळी त्यांनी विलासरावांचा एक किस्साही सांगितला. पाटील म्हणाले की, कोल्हापूरला 2002 साली पवार साहेबांची सभा होती. त्यावेळी पवार साहेब दिल्लीत होते. त्या कोल्हापूरच्या सभेत बोलतांना मी पवारसाहेबांना उद्देशून म्हणालो की, तुम्ही दिल्ली सोडून महाराष्ट्रात या. कारण, महाराष्ट्र खंबीर असेल तर दिल्लीत पक्षाचं वजन वाढेल, असं मी म्हणालो. नंतर दुसऱ्या दिवशी पवारांसोबत कोल्हापूरहून पुण्याकडे जात असतांना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचा फोन आला.

विलासरावांचा फोन आला, घेऊ का असं मी पवारसाहेबांना विचारलं. त्यावर पवार साहेब म्हणाले होते, वाटलंच होतं मला की, अजून विलासरावांचा फोन कसा आला नाही… मग मी फोन घेतला. तेव्हा जयंतराव तुम्ही मंत्रिमंडळाता राहता की मी राहू? अशी थेट विचारणा विलासराव देशमुखांनी केली होती, असं जयंत पाटील म्हणाले.

Exit mobile version