संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, जयंत पाटील यांची कार्यकर्त्यांना भावनिक साद

Jayant Patil : संघर्ष करण्यासाठी सर्वांनी तयार राहा, थोडासा काळ त्रासाचा असेल पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)मागे संपूर्ण महाराष्ट्र उभा राहणार आहे. पण त्यामध्ये तुम्ही सर्वांनी ताकदीनं ताकद उभी करा असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (NCP Sharad Pawar Group)प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं. ते अहमदनगरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आगामी काळात येणाऱ्या नगर दक्षिण लोकसभा निवडणूक (nagar dakshin lok sabha Election)आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना एक प्रकारे भावनिक साद जयंत पाटील यांनी घातली आहे.

‘चोर न्यायाधीश झाला अन् चोरांना सोडून दिलं’; NCP च्या निर्णयावर ठाकरेंची बोचरी टीका

यावेळी जयंत पाटील यांनी सरकारमध्ये अजित पवार गटाला मिळत असलेल्या वागणुकीवरुन जोरदार हल्लाबोल केला. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, राज्य सरकारमध्ये अजितदादा गट सहन करण्यापलीकडं काही करु शकत नाही, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या पेकाटात लाथ घाला आणि मंत्रिमंडळातून बाहेर काढा असं विधान केलं होतं.

आमिर सोबत असलेल्या नात्यावर किरण रावने केला मोठा खुलासा, म्हणाली, ‘प्रामाणिकपणा…’

संजय गायकवाड यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपैकी एकानेही तोंड उघडले नाही, अन् त्यांना समज दिली नाही. सरकारमध्ये सहन करण्यापलिकडे अजित पवार गट दुसरं काही करु शकत नाही. मंत्री छगन भुजबळ हे देखील त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत नाहीत.

मराठा समाजाच्या आरक्षणाची निर्णायक परिस्थिती आणण्याचं काम मनोज जरांगे करत आहेत. आमची अपेक्षा होती की, सरसकट मराठ्यांना आरक्षण देताना 50 -52 टक्क्यांच्या पुढं जाऊन मराठ्यांना आरक्षण दिलं जाईल, पण तसं काही झालं नाही. दुसरीकडं ओबीसी समाज देखील अस्वस्थ झाला आहे. त्यांच्याही सरकारकडून अपेक्षा आहेत, त्यावरही सरकार काही बोलत नाही.

धनगर समाजाच्याही मागण्यांच्या बाबतीत सरकार काही करत नाही. सगळं चित्र पाहिलं तर समाजात अस्थितरता निर्माण करण्याचं काम मागच्या दीड ते दोन वर्षात झालं. त्यासाठी तुम्ही डोळस होण्याची गरज आहे. आता विचारानं आपण कुठं थांबायचं अन् कुठं चालायचं याचा आपण विचार करायची गरज आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निकाल देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाला बहाल केलं. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा निर्णय आल्याने शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. आता शरद पवार गटाला लवकरात लवकर नवीन पक्ष चिन्ह आणि नावाची मागणी करावी लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज