Lok Sabha Election : उद्धव ठाकरे भर पावसात भिजले; मोदी-शाहांवर जोरदार कडाडले !

Lok Sabha Election Uddhav Thackeray Parbhani Meeting : राज्यभर महायुती व महाआघाडीच्या नेत्यांच्या जोरदार सभा होत आहे. मराठवाड्यात या नेत्यांची तोफ धडाडत आहे. मराठवाड्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. परभणीत मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसात शिवसेनेचे पक्षप्रमुख ( Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार बंडू उर्फ संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासाठी […]

Lok Sabha Election : उद्धव ठाकरे भर पावसात भिजले; मोदी-शाहांवर जोरदार कडाडले !

Uddhav Thackrey

Lok Sabha Election Uddhav Thackeray Parbhani Meeting : राज्यभर महायुती व महाआघाडीच्या नेत्यांच्या जोरदार सभा होत आहे. मराठवाड्यात या नेत्यांची तोफ धडाडत आहे. मराठवाड्यात जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. परभणीत मंगळवारी सायंकाळी जोरदार पाऊस सुरू झाला. या पावसात शिवसेनेचे पक्षप्रमुख ( Uddhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी महायुतीचे उमेदवार बंडू उर्फ संजय जाधव (Sanjay Jadhav) यांच्यासाठी सभा घेतली. या पावसात भिजत असताना उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह यांच्यासह मुख्यमंत्री यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.

अमित शहांनी पवारांना मागितला हिशोब! म्हणाले, तुम्ही ‘त्या’ 10 वर्षात किती…

मी वादळात उभा राहणार आहे. मी संकटाशी झुंज देणार आहे. मी हटणार नाही. येऊ दे संकटे किती यायचे आहे. त्या संकटाला आम्ही चिरडून टाकले आहे. या संकटा पुढे काय आहे. परभणी हा शिवसेनेचे बालेकिल्ला आहे. तो बालेकिल्ला राहणार आहे. भाजप, मिंध्ये यांच्या पैशाने जनता खरेदी केली जाऊ शकत नाही. परभणीकर पैशाने खरेदी करण्यासारखे नाहीत. ही आपली परीक्षा आहे. वादळाला अंगावर घेण्यासाठी आमच्याकडे छाती आहे. आम्ही पाठीवर वार करत नाही. आम्ही छातीवर वार करणारे शिवाजी महाराजांचे मावळे आहे, अशी गर्जनाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

‘ठाणे घ्या, नाशिक द्या’! शिंदेंना खिंडीत गाठून भाजपची ऑफर; गोडसेंचेही हेलापेट थांबेनात!

प्रचार गीतातून जयभवानी शब्द काढण्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मशाल गितेमध्ये जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख आहे. मोदी-शाहांचा नोकर निवडणूक आयोग हा जय भवानी हा शब्द काढण्यास सांगत आहे. त्यांना सांगा जय भवानी शब्द काढणार नाही. मोदी आणि शाह यांना महाराष्ट्रात जय भवानी म्हणत उठाबशा काढायला आम्ही लावू. तुमचा आकस महाराष्ट्राबाबत आहे. पण उद्धव ठाकरेंबरोबरची मर्द मावळे त्यांच्यासमोर उभे आहेत. तुम्हाला महाराष्ट्राचा रागा का आहे. आम्हीही जय श्रीराम, बजरंग बल्ली जय बोलतो. दिल्लीमध्ये बसले म्हणजे ते म्हणतील तसा देश त्यांचा एेकणार नाहीत. प्रेमाने मिठी मारली तेव्हा तुम्हाला साथ दिली आहे. पाठीवर वार केला तेव्हा माझी वाघनंख बाहेर आली आहेत. सुधीर मुनंगटीवारांसाठी शो बाजी नाही करत, बसा स्वताःची नख कापत बसा, असा टोलाही ठाकरेंनी लगावलाय.

जुमला ही मालिका किती वेळा बघायची ?

मोदींचे नाणे महाराष्ट्रात चालणार नाहीत. म्हणून गद्दार हे हिंदुहद्यसम्राटांचा चेहरा दाखवून मते मागत आहेत. मोदी हे घराणेशाहीवर बोलतात. तर आम्ही तुमच्या एकाधिकारशाहीवर बोलणार आहे. देशभरात भाकड पक्षाचा जुमला तीन सिझन आला आहे. 2014 जुमला एक, 2019 ला जुमला दोन आणि 2024 जुमला तीन सिझन घेऊन येत आहे. अॅक्टर तोच, स्टोरी रायटर तोच. आता किती वेळा ती मालिका बघायची आहे. पहिल्या दोन भागात आम्हाला वाटलं, महाराष्ट्राचं कल्याण होईल. दहा वर्षे महाराष्ट्र, देश नासून टाकला आहे, असे टाकरे म्हणाले. बंडू जाधव यांना पाच लाख मतांनी निवडून द्या आणि समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिड करावे, असे आवाहन ठाकरे यांनी केले.

Exit mobile version