Earthquake in Marathwada : मराठवाड्यातील अनेक भागांत आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर अनेक ठिकाणी घरांचे नुकसान झाले. काही कळण्याच्या आत जमीन हादरू लागल्याने नागरिक भीतीपोटी घराबाहेर पळाले. मराठवाड्यातील नांदेड, परभणी, बीड आणि हिंगोली जिल्ह्यात 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भुकंपाचे धक्के जाणवले. आज सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी भूकंपाचे बसायला सुरुवात झाली. तीन वेळेस हे धक्के जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. या भुकंपामुळे नागरिकांत भीती निर्माण झाली. भुकंपाला सुरुवात झाल्यानंतर लोकांनी घरातून बाहेर येत रस्त्याच्या दिशेने पळ काढला.
Earthquake : नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, 1.5 रिश्टर स्केलची नोंद, लोक घराबाहेर
या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा, बाळापूर भागात असल्याची माहिती आहे. या जिल्ह्यांतील भुकंपाची अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाने अजून दिलेली नाही. नांदेड शहरासह अर्धापूर, भोकर, हदगाव, नायगाव, मुखेडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूकंप झाला. या भूकंपामुळे घरांचे नुकसान झाले. भिंतींना तडे गेले.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत, औंढा यांसह 200 पेक्षा आधिक गावांना या भूकंपाचे धक्के बसले. हिंगोलीतील भूकंपाची माहिती हिंगोली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून 15 किलोमीटर अंतरावरील पांग्रा शिंद गावात असल्याचे सांगितले जात आहे.
China Earthquake : चीनमध्ये दुसऱ्या दिवशीही शक्तिशाली भूकंप; घरांची पडझड, नागरिकांची पळापळ