Earthquake : नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, 1.5 रिश्टर स्केलची नोंद, लोक घराबाहेर

Earthquake : नांदेडमध्ये भूकंपाचा सौम्य धक्का, 1.5 रिश्टर स्केलची नोंद, लोक घराबाहेर

Nanded Earthquake News : नांदेड (Nanded News) शहरातील काही भागात रविवारी सायंकाळी 6.18 वाजता भूकंपाचे सौम्य जाणवले. नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भूशास्त्र संकुलात भूकंप (Earthquake) मापन यंत्रावर त्याची 1.5 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. दरम्यान, भूगर्भातून येणाऱ्या या आवाजामुळे काही भागातील लोक रस्त्यावर आले.

ईव्हीएम घोटाळा करून सत्तेत याल तर असंतोषाचा भडका उडेल; उद्धव ठाकरेंचा भाजपला इशारा 

सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास शहरात जमिनीतून गूढ आवाज येत भूकंपाचे धक्के जाणवले. अचानक झालेल्या धक्क्यामुळे घरातील लोक रस्त्यावर आले. शहरातील व्हीआयपी रोड, शिवाजी नगर, श्रीनगर, विवेक नगर, रामराव पवार मार्ग, पावडेवाडी नाका, गणेशनगर, वजिराबाद, या भागात जमिनीवरून गूढ आवाज ऐकू आला आणि भूंकपाचा धक्का जाणवला. त्यामुळं नागरिकांनी एकच धावपळ केली.

Sunil Deodhar: पुण्याच्या स्थानिक प्रश्नांचे योग्य व सर्वंकष निराकरण होईल, यासाठी सर्वार्थाने प्रयत्न करणार 

विद्यापीठातील भूकंप मापक यंत्रणेच्या प्राथमिक अहवालानुसार, १० किलोमीटर अंतरावर या भुकंपाच्या धक्क्याची नोंद झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही या घटनेची दखल घेत त्यानुसार माहिती मागवली आहे.

दरम्यान, विद्यापीठातील भूविज्ञान विभागाचे प्रा. डॉ. टी विजयकुमार यांनी सांगितले की, याआधीही २००८ आणि २०१०-११ मध्ये नांदेडमध्ये या भागात असे सौम्य भूकंप झाले होते. दरम्यान, नागरिकांना घाबरून जाऊ नये, असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube