Download App

CM शिंदेंना धक्का! एक दोन नव्हे आठ नेत्यांचा जय महाराष्ट्र; ठाकरे गटात प्रवेश

माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे.

Maharashtra Elections 2024 : विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा धुराळा उडू (Maharashtra Elections 2024) लागला आहे. स्टार प्रचारक आणि नेत्यांच्या सभांनी राजकारण तापू लागलं आहे. तर दुसरीकडे फोडाफोडीचं राजकारणही जोरात सुरू आहे. नेत्यांचं इनकमिंग आणि आऊटगोईंग सुरू आहे. अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Eknath Shinde) धक्का देणारी बातमी आली आहे. धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. माजी नगराध्यक्ष सुवर्णा मुंडे यांचे पती सागर मुंडे यांच्यासह आठ माजी नगरसेवकांनी हाती शिवबंधन बांधलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घडामोडीने शिंदे गटाच्या स्थानिक संघटनेला धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरेंना धक्का! ऐन निवडणुकीच्या तोंडावर भारती कामडींचा जय महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाने आयात केलेल्या उमेदवाराला तिकीट दिल्याने नाराजी उफाळून आली. त्याची परिणती पुढे पक्षांतरात झाली. या घडामोडीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. त्याआधीच ही धक्का देणारी घडामोड घडली आहे. या प्रवेश सोहळ्यावेळी जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील उपस्थित होते.

यावेळी सागर मुंडे यांच्या बरोबरच माजी नगरसेवक नंदू हौसलमल, बाबूभाई बागरेचा, शंकर वाघमारे, शफीक काझी, मनीष पुरी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आणि समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश केला. मुंंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातही शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिवसेनेच्या उपविभाग प्रमुख रेणुका तांबे, शाखाप्रमुख संतोष शिंदे, श्रीकांत जावळे, अन्वर दुर्रानी यांनी कार्यकर्त्यांसह ठाकरे गटात प्रवेश केला.

पोहरादेवीच्या महंतांचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

दरम्यान, याआधी पोहरादेवी संस्थानचे महंत सुनील महाराज यांनी शिवसेना उबाठा (Shivsena UBT) पक्षाला जय महाराष्ट्र केला होता. निवडणूक अगदी जवळ आलेली असताना सुनील महाराज यांनी घेतलेला हा निर्णय ठाकरे गटासाठी मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. सुनील महाराज ठाकरे गटाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा होत्या. परंतु, उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. उद्धव ठाकरेंना पत्र लिहून आपण पक्ष सोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते.

मुलांना फ्री शिक्षण अन् बेरोजगार तरुणांना 4 हजार, उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा

follow us