Tanaji Sawant : भूम परांडा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत यांनी (Tanaji Sawant) जोरदार प्रचार सुरू केला आहे. गावोगावी जात नागरिकांच्या भेटी घेत आहेत. प्रचार सभांचा धुराळा उडाला आहे. पाथ्रूड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधताना तानाजी सावंत यांनी एक महत्वाची संकल्पना मांडली. शेतकऱ्यांचा शेतमाल थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहोचवण्याच्या उद्देशाने या संकल्पनेचे महत्व आहे.
शेतकरी हा आपला अन्नदाता आहे. त्यांच्या मेहनतीचे योग्य मूल्यमापन होणे हे आपले सर्वांचे कर्तव्यच आहे. म्हणूनच पाथ्रूड येथे माझ्या मतदारांसमोर एक महत्वपूर्ण फार्मिंग एअरपोर्ट संकल्पना आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल ४८ तासांच्या आत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्याची ही अभिनव संकल्पना आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला अधिक चांगला बाजारभाव मिळेल व आर्थिक सुबत्ता प्राप्त होईल, असे तानाजी सावंत म्हणाले.
तानाजीरावांचा नाद कुणी करायचा नाही; भरसभेत CM शिंदेचा एल्गार, ठाकरेंवर हल्लाबोल
मी पुन्हा विधानसभेत निवडून गेल्यानंतर पहिल्या दोन वर्षांत या संकल्पनेला प्रत्यक्षात आणणार आहे. या फार्मिंग एअरपोर्टमुळे आपले शेतकरी समृद्ध होतील आणि महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रात क्रांती घडवेल. आजपर्यंत भूम परंडा वाशी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करत आलो आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम म्हणून तिन्ही तालुक्यांत विविध विकासकामे मार्गी लागली आहेत तर काही कामे प्रगतीपथावर आहेत असे तानाजी सावंत यांनी सांगितले.
दरम्यान, परंडा विधानसभा मतदारसंघ भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ. परंडा-भूम-वाशी या तीन तालुक्यांत तब्बल 247 गावांमध्ये हा मतदारसंघ पसरला आहे. दुष्काळी भाग असला तरी ऊस आणि साखर हे या मतदारसंघातील राजकारणाचे अस्त्र.
याच अस्त्राच्या जोरावर ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मसिंह पाटील यांनी आपला प्रभाव तयार केला होता. या प्रभावातून त्यांनी महारुद्र मोटे यांचे नेतृत्व उभे केले आणि घडवले. ते 1985 आणि 1990 असे सलग दोनवेळा ते आमदार झाले. 1995 मध्ये महारुद्र मोटे यांचा काही मतांनी पराभव झाला. ‘खान पाहिजे की बाण’ या मराठवाड्यातील ढवळलेल्या वातावरणात 1995 मध्ये ज्ञानेश्वर पाटील यांनी पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा या मतदारसंघावर फडकवला.
तानाजी सावंत आव्हान पेलणार! भूम-परांडा खेचून आणणार?