Download App

‘लोकसभेसाठी इच्छुक पण, ठाकरे गटातच राहणार’; नाराजीच्या चर्चांना दानवेंचा फुलस्टॉप!

Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधीच त्यांनी प्रचाराचा नारळही फोडला. या घडामोडींवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे नाराज (Ambadas Danve) झाले. तशा चर्चा सुरू झाल्या. येत्या एक ते दोन दिवसांत दानवे शिंदे गटात प्रवेश करतील असेही बोलले जाऊ लागले. राज्याच्या राजकारणात आज सकाळपासून याच घडामोडीची चर्चा आहे. मात्र, या चर्चांवर स्वतः अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत पूर्णविराम दिला. मी नाराज असल्याच्या चर्चांत काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त पाच दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार आहे, असे दानवे यांनी माध्यमांना सांगितले.

Sanjay Raut : ‘देणग्या देणारे ठेकेदार हाच मोदींचा परिवार’ इलेक्टोरल बाँडवरून राऊतांचा घणाघात

अंबादास दानवे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर दानवे यांनी स्पष्टीकरण दिले. मी नाराज असल्याच्या चर्चांत काहीच अर्थ नाही. शिंदेंची शिवसेना फक्त पाच दिवसांची आहे. मी ठाकरेंसोबतच राहणार आहे. मी शिवसैनिक आहे आणि आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे अशा चर्चांकडे लक्ष देण्याची गरज नाही. मागील  दहा वर्षांपासून मी लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहे. मी माझी इच्छा कधीच लपवून ठेवलेली नाही. पक्षप्रमुखांना देखील हे माहिती आहे, असेही दानवे म्हणाले.

मला जर शिंदे गटात जायचं असतं तर मी पहिल्याच दिवशी गेलो असतो. जनतेच्या कामांसाठी काही वेळेस सत्ताधाऱ्यांशी बोलणे होत असते. सीट मिळो अथवा न मिळो संघटनेसाठी काम करण्याचा माझा नेहमीच विचार असतो. पक्षप्रमुखांकडे मलाही काही मागण्याचा अधिकार आहे. परंतु ते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहिल असेही विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

Lok Sabha Elections : ‘दानवेंनी गद्दारी केल्याने लोकसभेत पराभव’ ठाकरेंच्या नेत्याचा गौप्यस्फोट

मी दहा वर्षांपासून लोकसभेसाठी इच्छुक 

लोकसभेसाठी मी इच्छुक आहे मी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. मागच्या दोन्ही वेळेला सुद्धा ही गोष्ट मी त्यांना सांगितली होती. मी पक्षाचा सैनिक आहे. यानंतरही जर चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली गेली तरी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करील. पण, काहीही झालं तरी एकनाथ शिंदेंबरोबर जाणार नाही, असे दानवे यांनी सांगितले.

खैरे कायमच मला डावलतात 

पक्षप्रमुखांनी अजून कोणताच चेहरा दिलेला नाही. मी इच्छा व्यक्त केली आहे. आता ते कुणाला उमेदवारी देतात ते पाहू. चंद्रकांत खैरे नेहमीच मला डावलत असतात. हे काही आजचं नाही. मी उद्धव ठाकरेंसाठी काम करतो चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचं काम करत नाही. त्यामुळे खैरे माझ्याबाबत काय बोलतात याचं मला देणंघेणं नाही, असे दानवे यांनी स्पष्ट केले.

follow us