Download App

Manoj Jarange : हात थरथरू लागले, नाकातून रक्तस्त्राव; मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

Image Credit: Letsupp

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण (Manoj Jarange) उपोषणास सुरुवात केली आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यावेळचे त्यांचे उपोषण अधिक कठोर आहे. कारण त्यांनी या काळात पाणी घेतलेले नाही तसेच औषधोपचारासही नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. प्रकृतीची तपासणी करण्यासाठी डॉक्टर त्यांना विनवणी करत आहेत मात्र जरांगे पाटील त्यांच्या निश्चयावर ठाम आहेत. त्यामुळे डॉक्टरही चिंतेत पडले आहेत. सरकारी अधकारी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र जरांगे यांनी कोणतीही तडजोड नाही आधी मागण्या पूर्ण करा आणि मगच या अशी भूमिका घेतली आहे. शिंदे-फडणवीस मराठ्यांची फसवणूक करत आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Manoj Jarange : ‘नाशिक दौऱ्यात अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला’ मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाचे कायद्यात रुपांतर करा या मागणीसाठी जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. आज मात्र त्यांची तब्बेत खालावली आहे. तरीही ते उपचाराला नकार देत आहेत. त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी काल जिल्हा आरोग्य पथक आले होते मात्र नाडी आणि रक्तदाब तपासण्यासाठी जरांगे पाटील यांनी विरोध केला. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावताच त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. काल रात्री जालना-जळगाव रोडवर टायर जाळण्यात आले. आज राज्यात ठिकठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येणार आहे.

सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशावर अंमलबजावणी झाल्याशिवाय मी पाणी देखील घेणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली आहे. मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते. बोलण्यासही त्यांना त्रास होत होता. आता तर त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचीही माहिती येत आहे. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांचीही चिंता वाढली आहे. अन्न व पाणी न घेतल्याने त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे.  मित्रमडळी, सहकारी आणि गावकऱ्यांकडून त्यांना उपचार आणि पाणी पिण्याचा आग्रह होत आहे. सोमवारी रात्री जालन्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली मात्र त्यांनी नकार दिला. अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत पाणी घेणार नाही, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.

Manoj Jarange : “सरकारची भूमिका स्पष्ट नाही म्हणून मी”.. उपोषणाआधी जरांगेंचा सरकारला इशारा

follow us

वेब स्टोरीज