Manoj Jarange : ‘नाशिक दौऱ्यात अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange : ‘नाशिक दौऱ्यात अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाला’; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

Manoj Jarange : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत (Maratha Reservation) आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर जरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलन काही काळासाठी स्थगित केले होते. मात्र सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नाशिक दौऱ्यात माझ्यासोबत घातपात करण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट पत्रकार परिषदेत केला.

जरांगे पाटील पुढे म्हणाले, नाशिक दौऱ्यात (Nashik) असताना आपल्या अंगावर गाडी घालून अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न झाला होता. नाशिक जिल्ह्यातील साल्हेर किल्ल्यावर हा प्रकार घडला. पोलिसांनी त्या वाहनचालकाला ताब्यात देखील घेतले होते असा दावा त्यांनी केला. माझ्या जीवाला धोका असला तरी घाबरत नाही. अशा घटनांची मी कुठे वाच्यताही करत नाही.

Manoj Jarange : “सरकारची भूमिका स्पष्ट नाही म्हणून मी”:.. उपोषणाआधी जरांगेंचा सरकारला इशारा

आमच्यासोबत सात वेळा अशा घटना घडल्या. पण याबाबत कुठे कधी वाच्यता केली नाही. साल्हेर किल्ल्याजवळ असताना आमच्या गाडीवर टेम्पो आला होता पण, तरीही आम्ही संरक्षणाची मागणी केली नाही. आमच्यासोबत घातपाताचा प्रकार घडला म्हणून कुठेही सांगितलं सुद्धा नाही. आम्ही किल्ल्यावर गेलो त्यावेळी सगळ्या गाड्या खाली लावण्यात आल्या होत्या. मग पिकअप वर आली कशी. त्यावेळी ही गोष्ट आमच्या लक्षात आली नाही. मात्र त्यानंतर पोलीस लवकर चला म्हणूत गडबड करत असल्याने शंका आली. काहीतरी घडत असल्याचे लक्षात आले पण नेमकं काय झालं हे पोलिसांनी आम्हाला कळूच दिलं नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

पिकअप सारख्या गाडीचे ब्रेक फेल झाले आणि ही गाडी जोरात वरून खाली येत होती. ही गाडी आमच्या अंगावरून गेली असती तर आमचा भुगाच झाल असता. पण एकाने जोराने आवाज दिला आणि हा प्रकार लक्षात आला. पटापट उड्या मारून बाजूला पडले. यानंतर पोलिसांनीही त्या वाहनचालकाला ताब्यात घेतले. त्याने कुणाचे तरी नाव घेतले. आता हा प्रकार खरा आहे की खोटा आहे याची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे केल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange : ओबीसींच्या सभा घेतल्याने भुजबळांवरील तीन केसेस मागे; जरांगे यांचा गंभीर आरोप

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज