Maharashtra Weather Forecast : मराठवाड्यात अनेक ठिकाणी सोमवारी अवकाळी पावसाने हजेरी (Maharashtra Weather Forecast) लावली. या पावसाने शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले. काही जिल्ह्यांना गारपिटीचाही तडाखा बसला. आताही हवामान विभागाने मराठवाड्याला जोरदार (IMD Rain Alert) पावसाचा अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी गारपीट होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात काल सोमवार (दि. ४ मे) रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्याने (Marathwada) फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. यामध्ये विशेषत: आंबे, द्राक्षाच्या बागांसह शेतीमालातील कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.
मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान; वादळी वाऱ्यासह गारांच्या धारा, पिकांचं अतोनात नुकसान
मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. दुपारनंतर वादळासह गारपीट आणि पाऊस झाला. पावसामुळे भाजीपाला, फळबागा आणि शेतमालाचे मोठे नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोडापूर (ता. गंगापूर) येथे शेतवस्तीवरील अशोक नंदू म्हस्के (२२) या तरुण शेतक-याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मगरवाडी (ता. अंबाजोगाई) येथील सचिन मधुकरराव मगर (३५) यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला.
लातूर शहरासह जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. लातूर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रेणापूर शहरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. बीड जिल्ह्यातही केज तालुक्यात चिंचोली माळी, हदगाव, डोका, सारुकवाडी परिसरात गारांसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं शेती पिकं, फळझाडांचे मोठं नुकसान झालं.
विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातही सोमवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. हवामान विभागाने आज परभणी, नांदेड, हिंगोली, जळगाव, नाशिक, नंदूरबार या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच आज संध्याकाळी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार या ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका : करो या मरो… ठाकरे आणि शरद पवारांचे मिशन