मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान; वादळी वाऱ्यासह गारांच्या धारा, पिकांचं अतोनात नुकसान

मराठवाड्यात अवकाळी पावसाचं थैमान; वादळी वाऱ्यासह गारांच्या धारा, पिकांचं अतोनात नुकसान

Unseasonal Rains In Marathwada : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर आणि परभणी जिल्ह्यात काल सोमवार (दि. ४ मे)रोजी सायंकाळी वादळी वाऱ्यासह गारपीट आणि पाऊस झाल्याने (Marathwada) फळबागा आणि शेतीचे मोठे नुकसान झालं आहे. यामध्ये विशेषत: आंबे, द्राक्षाच्या बागांसह शेतीमालातील कांदा पिकाचं अतोनात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर अंगावर वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे.

….पुन्हा अवकाळी अन् गारपीटचं संकट, राज्यातील तापमानाबाबत IMD चा काय अंदाज?

मराठवाड्याच्या काही भागाला सोमवारी अवकाळी पावसाने झोडपले. दुपारनंतर वादळासह गारपीट आणि पाऊस झाला. पावसामुळे भाजीपाला, फळबागा आणि शेतमालाचे मोठे नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोडापूर (ता. गंगापूर) येथे शेतवस्तीवरील अशोक नंदू म्हस्के (२२) या तरुण शेतक-याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातील मगरवाडी (ता. अंबाजोगाई) येथील सचिन मधुकरराव मगर (३५) यांचा शेतात वीज पडून मृत्यू झाला.

उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

ढोरवाडी (ता. वडवणी) येथील अभिमन्यू पांडुरंग नलभे (३६) यांचाही वीज पडून मृत्यू झाला. जालना जिल्ह्यातील परतूर येथील शेख मुख्तार शेख अख्तर कुरेशी यांचा बैल दगावला असल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले. परभणी जिल्ह्यातील कोरवाडी (ता. जिंतूर) येथील समाधान सुदाम कोंडाळ यांच्या शेतातील गोठ्यावर वीज पडून गाय आणि वासराचा होरपळून मृत्यू झाला. छत्रपती संभाजीनगर तालुक्यासह जिल्ह्यातील सिल्लोड, खुलताबाद, फुलंब्री, पैठण, वैजापूर तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले. जालना जिल्ह्यातील बदनापूर, रोहिलागड परिसरातही मोठा पाऊस झाला.

लातूर, बीडमध्ये अवकाळी

लातूर शहरासह जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. लातूर शहरात सायंकाळी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. रेणापूर शहरात वीजपुरवठा खंडीत झाला होता. बीड जिल्ह्यातही केज तालुक्यात चिंचोली माळी, हदगाव, डोका, सारुकवाडी परिसरात गारांसह अवकाळी पाऊस झाला. त्यामुळं शेती पिकं, फळझाडांचे मोठं नुकसान झालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube