नगर, पुण्यासह राज्याला अवकाळीने झोडपले! विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्याने नागरिकांची तारांबळ

नगर, पुण्यासह राज्याला अवकाळीने झोडपले! विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्याने नागरिकांची तारांबळ

Unseasonal rains hit the Ahilyanagar, Pune and the state! Lightning strikes, gusty winds leave citizens stranded : गेल्या काही दिवसांपासून राज्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलंय. आता पुढील पाच दिवसही कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पावसाची धार सुरुच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आहे. त्यात आज मंगळवार 20 मे रोजी अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यासह राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे.

लोकांची अन्न-अन्न दशा पण सरकार अन् लष्कर मात्र… युनोच्या रिपोर्टमध्ये पाकमधील धक्कादायक वास्तव समोर

यामध्ये पुण्यातील विविध भागांमध्ये विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये पुणे शहरात जोरदार पाऊस झाल्यामुळे पुणे – मुंबई महामार्गावर पुण्यातीलखील चांदणी चौकात अक्षरश: चौपाटी अवतरल्याचं पाहायला मिळालं. पुणे विमानतळ परिसरात देखील पाणी भरलं होतं. दुसरीकडे अहिल्यानगरच्या अनेक तालुक्यांसह शहरात देखील विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मुंबईतील उपनगराच्या वेगवेगळ्या भागात मान्सूनपूर्व पाऊस विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस बरसला. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. विविध भागांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. दहिसर बोरिवली कांदिवली मालाड गोरेगाव आणि अंधेरी भागात पावसाची हजेरी लागल्याचं पाहायला मिळालं.

‘त्या’ दिवसांत पाकिस्तानमध्ये खूप प्रेम मिळालं; तपासात ज्योती मल्होत्राची ‘डायरी’ उघडली

दरम्यान अंदमान बेटांवर आणि पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात मान्सूनचा प्रवेश झाला असून या प्रभावामुळे महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण तयार झाले आहे. (Weather) या ढगाळ वातावरणामुळे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि ५० ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने येत्या मंगळवार (ता. २०) आणि बुधवार (ता. २१) या दोन दिवसांसाठी संपूर्ण महाराष्ट्राला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. याचा अर्थ या काळात राज्यभर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. पुणे शहरात सध्या तापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या वरून ३५ अंशांपर्यंत घसरले आहे. दिवसाभर ढगाळ वातावरण आणि संध्याकाळच्या वेळेस पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे उकाड्यापासून थोडासा दिलासा मिळत आहे.

या भागाला पावसाचा इशारा

कोकणात सोमवारी (ता. १९) आणि मंगळवारी (ता. २०) काही ठिकाणी पावसाचा इशारा आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागात मंगळवार आणि बुधवार (ता. २१) रोजी पावसाची शक्यता अधिक आहे. विदर्भ भागात मात्र पुढील पाच दिवस सातत्याने पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. कोकणात रविवारी (ता. १८) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाचे जोर वाढत चालला आहे.

चीनी आणि तुर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी घेतली शपथ

विशेषतः पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, धुळे, नाशिक तसेच त्यांच्या आसपासच्या घाट भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि ५०-६० किमी वेगाने वाऱ्याचे तुफान यावेळी अपेक्षित आहे. यामुळे या जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे, जे पूर्णपणे लक्षात घेणे आवश्यक आहे. या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नुकसान होण्याचीही शक्यता असते, त्यामुळे लोकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube