‘त्या’ दिवसांत पाकिस्तानमध्ये खूप प्रेम मिळालं; तपासात ज्योती मल्होत्राची ‘डायरी’ उघडली

‘त्या’ दिवसांत पाकिस्तानमध्ये खूप प्रेम मिळालं; तपासात ज्योती मल्होत्राची ‘डायरी’ उघडली

Jyoti Mhalhotra : पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध एकामागून एक कठोर पावले उचलत आहे. भारत सरकार आता केवळ पाकिस्तानविरुद्धच नाही तर देशात लपलेल्या पाकिस्तानी हेरांवरही कठोर कारवाई करत आहे. अलिकडेच देशातील अनेक राज्यांमधून पाकिस्तानी हेरांना अटक केली जात आहे. राष्ट्रीय एजन्सी या सर्वांविरुद्ध चौकशी करत आहेत. (Mhalhotra) सध्या, त्यापैकी सर्वात मोठे नाव म्हणजे YouTuber ज्योती मल्होत्रा. तपासादरम्यान, ज्योतीची डायरी समोर आली आहे, ज्यामध्ये तिचे पाकिस्तानवरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते.

सुरक्षा एजन्सी ज्योती मल्होत्राची सतत चौकशी करत आहेत. तिने पाकिस्तानला पाठवलेली सर्व माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्योतीची चौकशी केल्यानंतर, तीच्या डायरीतील काही पानं आता समोर आली आहेत. ज्योतीने २०१२ च्या कॅलेंडरच्या डायरीत पाकिस्तानबद्दलच्या तिच्या भावना लिहिल्या आहेत. तीने लिहिलं आहे की, आपण सर्व एकाच मातीपासून बनलेले आहोत. एवढंच नाही तर पाकिस्तानला भेट देण्यासाठी खूप कमी वेळ मिळाल्याची खंतही व्यक्त केली आहे.

नवी धक्कादायक माहिती आली समोर; ज्योतीच्या टार्गेटवर होतं ‘हे’ प्रसिद्ध मंदीर?

‘मी पाकिस्तानहून १० दिवसांच्या प्रवासानंतर परतली आहे. आपला देश भारत आहे. पाकिस्तान या काळात मला पाकिस्तानच्या लोकांकडून खूप प्रेम मिळालं. अनेक मित्रही भेटायला आले. मला लाहोरला भेट देण्यासाठी फक्त दोन दिवस मिळाले जे खूपच कमी होते अशा भावना ज्योतीने व्यक्त केल्या आहेत.

दोन देशांमध्ये सीमांचं अंतर किती काळ राहील हे माहित नाही. परंतु, मनातील तक्रारी पुसून टाकल्या पाहिजेत. हे लिहिताना त्यांनी लिहिलं आहे की सर्वजण एकाच मातीचे बनलेले आहेत. तसंच, पाकिस्तान सरकारने भारतीयांसाठी अधिक गुरुद्वारा आणि मंदिरांचा मार्ग खुला करावा. तिथल्या मंदिरांचेही रक्षण करा. जेणेकरून हिंदूंनाही तिथे भेट देता येईल आणि १९४७ मध्ये वेगळे झालेले कुटुंब एकमेकांना भेटू शकतील असंही ज्योती म्हणाली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube