उष्णता वाढणार, घामाच्या धारा निघणार; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट

Maharashtra Weather Update : राज्यात उष्णतेचा प्रकोप प्रचंड वाढत चालला आहे. दुपारच्या वेळेत (Maharashtra Weather) तापमानात प्रचंड वाढत चालले आहे. त्यामुळे घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. एप्रिल महिन्यात तापमानात मोठी वाढ होईल असा इशारा आधीच देण्यात आला होता. हा अंदाज खरा ठरला असून या महिन्यात उष्णता प्रचंड वाढली आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूरसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीतील नागरिकांना सुद्धा उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
विदर्भात सध्या उष्णता प्रचंड वाढली आहे. चंद्रपूर सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. चंद्रपूरमध्ये तापमान 45.8 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अकोला, अमरावती, नागपूर आणि ब्रह्मपुरी या शहरांतही तापमानाने 45 अंशांपर्यंत मजल गाठली आहे. या दिवसांत नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. पश्चिम विदर्भासह पूर्व भागातील शहरांत तापमानात वाढ होणार आहे. मराठवाड्यातील बीड, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत पारा वाढणार आहे. या जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चंद्रपूर ठरलं जगातील सर्वात उष्ण शहर; काळजी घ्या, ‘या’ जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट
राज्यातील जनता सध्या हवामानातील चढ उताराचा अनुभव घेत आहे. मार्च महिन्यात रणरणतं ऊन होतं. पण शेवटच्या आठवड्यात हवामानात मोठा बदल झाला. सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने वातावरणातील उकाडा कमी झाला पण शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले. यानंतर एप्रिल महिन्यात तापमानात वाढ होईल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. हा अंदाजही खरा ठरला. या महिन्यात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा 45 अंशांपर्यंत पोहोचला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार आजपासून 29 एप्रिलपर्यंत देशात अनेक भागांत उष्णता वाढणार आहे. पश्चिम मध्य प्रदेशात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती दिसून येईल. 23 ते 26 एप्रिल दरम्यान उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच आज आणि उद्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी उष्णता वाढण्याची शक्यता आहे.