Meghna Bordikar News : परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर एका (Meghna Bordikar) सरकारी कार्यक्रमात ग्रामसेवकावर चांगल्याच संतापल्या. कानाखाली मारण्याची भाषा त्यांनी केला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी मंत्री बोर्डीकर यांच्यावर घणाघाती टीका केली. आमदार रोहित पवार यांनी हा सोशल मीडियावर शेअर करत बोर्डीकरांवर निशाणा साधला होता. आता या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. माझा तो राग माझ्या लाडक्या बहिणींच्या हक्कासाठी होता, असे बोर्डीकर यांनी सांगितले.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीच हा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला होता. सभागृहात रमी खेळणारे.. पैशांच्या बॅगा भरणारे..डान्सबार चालवणारे..आधी वाकडं काम करून नंतर सरळ करणाऱ्यांचा गौरव करणारे..यामध्ये भर पडली ती आता थेट अधिकाऱ्यांच्या कानाखाली वाजवण्याची धमकी देणाऱ्या मंत्र्याची.. सरकारी कार्यक्रमात घरकुलाच्या लाभार्थ्यांना आणण्याचं टार्गेट असे कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिले होते.
Video : रोहित पवारांकडून अर्धवट माहितीवर दिशाभूल; ‘त्या’ व्हायरलं व्हिडिओवर काय म्हणाल्या बोर्डीकर?
रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा, मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो. त्यांच्याकडं पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडं आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली. मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.
बोरी मोठं गाव आहे, गावची लोकसंख्या 20 हजारांची आहे. त्याठिकाणी मागं पुढे काय बोलली, हेदेखील तुम्ही बघितला पाहिजे होते. जेव्हा रोज मोलमजुरी करुन या पात्र लाभार्थी महिला आहे, त्यांना ग्रामसेवक सांगतो, अमुकतमुक व्यक्तीचा घरी जा, तरच तुम्हाला देतो, टाळाटाळ करतो, पैशांची मागणी करतो. या सगळ्या महिला मोलमजुरी करणाऱ्या , कोणी विधवा होत्या. त्या सगळ्या माझ्याकडं येऊन रडत होत्या. माझा तो त्रागा मी जे बोलले, ते माझ्या लाडक्या बहिणींसाठी बोलले. हा ग्रामसेवक कोणाचं तरी ऐकून गरिबांना त्रास देत आहे. गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, असेही मी व्हिडीओत बोलले आहे, असंही त्या म्हणाल्या.
पुणे एमआयडीसीत अजितदादांची दादागिरी? CM फडणवीसांच्या विधानावर रोहित पवारांचा सवाल, राजकीय भडका