Video : रोहित पवारांकडून अर्धवट माहितीवर दिशाभूल; ‘त्या’ व्हायरलं व्हिडिओवर काय म्हणाल्या बोर्डीकर?

Video : रोहित पवारांकडून अर्धवट माहितीवर दिशाभूल; ‘त्या’ व्हायरलं व्हिडिओवर काय म्हणाल्या बोर्डीकर?

Meghana Bordikar & Rohit Pawar : आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी एका कार्यक्रमात ग्रामसेवकाला काणाखाली मारण्याची धमकी दिली. त्या घटनेचा व्हिडिओ राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केला होता. (Bordikar) या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. कालपासून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मेघना बोर्डीकर यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

रोहित पवार यांनी अर्धवट माहितीच्या आधारे राज्यातील जनतेची दिशाभूल करू नये. बोरी येथील विधवा,मोलमजुरी करणाऱ्या सामान्य महिलांचा पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी हा ग्रामसेवक छळ करतो, त्यांच्याकडं पैशांची मागणी करतो, अशी तक्रार होती. त्याची वारंवार तक्रार करूनही तो ऐकत नव्हता. त्या कार्यक्रमात काही महिला माझ्याकडं आल्या. त्यामुळे मी एक पालक या नात्याने ग्रामसेवकाला ज्या भाषेत कळते त्याच भाषेत समज दिली. मी त्या रागातून संबंधित ग्रामसेवकाला बोलले, असं मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं आहे.

पोलिसांनी पकडलेल्या दारुच्या ट्रकवर मंत्र्याचं नाव; मंत्री बोर्डीकर म्हणतात, ट्रक माझ्या नातेवाईकाचा पण..

बोरी मोठं गाव आहे, गावची लोकसंख्या 20 हजारांची आहे. त्याठिकाणी मागं पुढे काय बोलली, हेदेखील तुम्ही बघितला पाहिजे होते. जेव्हा रोज मोलमजुरी करुन या पात्र लाभार्थी महिला आहे, त्यांना ग्रामसेवक सांगतो, अमुकतमुक व्यक्तीचा घरी जा, तरच तुम्हाला देतो, टाळाटाळ करतो, पैशांची मागणी करतो. या सगळ्या महिला मोलमजुरी करणाऱ्या , कोणी विधवा होत्या. त्या सगळ्या माझ्याकडं येऊन रडत होत्या. माझा तो त्रागा मी जे बोलले, ते माझ्या लाडक्या बहि‍णींसाठी बोलले. हा ग्रामसेवक कोणाचं तरी ऐकून गरिबांना त्रास देत आहे. गोरगरिबांना घरकुलाचा लाभ मिळाला पाहिजे, असेही मी व्हिडीओत बोलले आहे, असंही त्या म्हणाल्या.

जिंतूर तालुक्यातील बोरी येथील कार्यक्रमातील व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट केला होता. या कार्यक्रमात भाषण करताना मेघना बोर्डीकर ग्रामसेवकावर संतापल्याचे दिसून आले. त्यांनी म्हटले की, “असं कुणाचं काम केलं ना तर याद राख हे मेघना बोर्डीकरचे शब्द आहेत. कानाखाली मारीन पगार कोण देते हा आताच्या आता बडतर्फ करेल. चमचेगिरी कोणाची करायचे नाही, याद रख तू काय कारभार करतो हे मला माहित नाही का? मी मुद्दामून सीईओ मॅडमला इथे घेऊन आले आहे हमाली करायची ना तर सोडून दे नोकरी, असे मेघना बोर्डीकर यांनी म्हटलं होतं. हा व्हिडीओ ट्विट करत मेघना बोर्डीकर यांच्यावर रोहित पवार यांनी टीकास्त्र सोडलं होतं. भर कार्यक्रमात ग्रामसेवकाला थेट कानाखाली मारण्याची धमकी राज्यमंत्री कोणत्या अधिकारात देऊ शकतात?, असा प्रश्न पवारांनी केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube