Download App

आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ अन् मराठवाड्यात गारपीट; ‘या’ जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात मागील काही दिवसांपासून हवामानात (Maharashtra Weather Update) मोठा बदल झाला आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात पावसाळ्याचा अनुभव येत आहे. अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा (Heavy Rainfall) तडाखा बसला आहे. या अवेळी झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. यामुळे उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता दिसून येत आहे. हवामान विभागाने आज अनेक ठिकाणी गारपीट (Maharashtra Rain) होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

आज नाशिक, बीड, अमरावती, चंद्रपूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव आणि जालना या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. तर काही भागांत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अन्य ठिकाणी तापमानात वाढ होईल असाही अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. या गारपीट आणि पावसाचा शेतातील पिकांना फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

सावधान! राज्यात पुढील पाच दिवस अवकाळी बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट

राज्यात सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवत असून तापमानात रोज वाढ होत आहे. वाढत्या उन्हामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना उन्हापासून बचावाची आवश्यक काळजी घ्यावी अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. मार्च महिन्यात हवामान विभागाने अनेक भागांत तीन वेळा उष्णतेचा इशारा दिला होता. होळीनंतर उष्णतेत मोठी वाढ होते असा अनुभव आहे. मात्र यंदा काही ठिकाणी अवकाळी पाऊस होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

राज्याची राजधानी मु्ंबई शहरात काल दिवसभर ढगाळ हवामान होते. आज या शहरात हलका पाऊस होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. लातूर जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली. पश्चिम महाराष्ट्रातही हवामानात मोठा बदल झाला आहे. विदर्भातील चंद्रपुरातील ब्रह्मपुरी येथे मात्र काल उच्चांकी तापमानाची नोंद झाली.

follow us