दोघांनी षडयंत्र रचलं; ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांचा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

मला निवडून येण्यामध्ये अडचणी याव्यात या दृष्टिकोनातून षडयंत्र रचलं गेलं. परळीच्या दोघा बहीण-भावांनी षडयंत्र रचलं

News Photo   2026 06 14T161528.728

दोघांनी षडयंत्र रचलं; ज्येष्ठ नेते प्रकाश सोळंके यांचा पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

बीडमध्ये राजकारण पुन्हा तापले आहे. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी परळीच्या बहीण-भावानं माझ्याविरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिली. त्यांनी आपल्याविरोधात या दोघांनी काय काय केले याचा पाढाचा वाचला. त्यामुळे जिल्ह्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी आणि नंतरही प्रकाशदादा सोळंके यांनी आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. काल एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पुन्हा दोघेंचे नाव न घेता तोफ डागली.

विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्याच नाही तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये ओबीसी उमेदवार उभे केले गेले.गेवराई, आष्टी, माजलगाव मध्ये, त्याचा उद्देश एवढाच होता की आमचा पराभव करायचा. कारण आम्ही मराठा आंदोलनाला, मराठ्यांच्या मागण्याला उघडपणे पाठिंबा दिला होता हे एक कारण असावं. आणि लोकसभेमध्ये पंकजाताईंचा झालेला पराभव हे देखील कारण असावं. लोक विरोधात असताना लोकसभेमध्ये माझ्या मतदारसंघांमध्ये पंकजाताईंना 1000 मतांचं लीड दिलं. माझ्या विरोधात तर एक मराठ्याचा आणि ओबीसींचे दोन उमेदवार उभे केले गेले.

गोठ्यात एकही गाय, म्हैस नाही पण दूध 100 लिटर कसं?, बीडच्या आष्टीचं भयान वास्तव

मला निवडून येण्यामध्ये अडचणी याव्यात या दृष्टिकोनातून षडयंत्र रचलं गेलं. परळीच्या दोघा बहीण-भावांनी षडयंत्र रचलं, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे त्यांचं स्वागत करावं तेवढं कमी आहे. दोन लाखापर्यंत कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यामध्ये अटी, शर्थी आहेत त्या अजून जाहीर झालेल्या नाहीत. 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी होत आहे. याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं पाहिजे. रोहित दादांना मी समजावून सांगावं असं नाही. पण दोन लाखांचा फायदा होणार आहे.

काहीतरी व्यंग काढायचं, काहीतरी कमीपणा दाखवायचा आणि स्वत:चं राजकीय नेतृत्व पुढे न्यायचं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही, अशी टीका प्रकाश सोळंके यांनी केली. ओमप्रकाश शेटे सर्रास पदाचा गैरवापर करतात, नाही त्या गोष्टींमध्ये नाक खुपसतात याचा अनुभव मी घेतलेला आहे. मुख्यमंत्र्यांकडे आणि बावनकुळे यांच्याकडे त्यांनी अपक्ष उमेदवारांचा प्रचार केलेला पुरावा दिलेला आहे. परंतु त्यांच्या हस्तक्षेपाच्या बाबतीत अजून तक्रार केलेली नाही मी माझ्या परीने त्यांचा हस्तक्षेप थांबवण्याचा प्रयत्न करतोय असे आमदार सोळंके म्हणाले.

Exit mobile version