Download App

धनंजय मुंडेंच्या लाभार्थी टोळ्या संपल्या पाहिजेत, आक्रोश मोर्चात जरांगेंचा हल्लाबोल

देशमुख कुटुंबावर जी वेळ आली, ती राज्यातील कोणावरही येऊ नये. भविष्यात जर हे होऊ द्यायचे नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा - जरांगे

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही एक इंचही मागे हटणार नाहीत. धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या लाभार्थी टोळ्या संपत नाही, तोपर्यंत मोर्चे काढले जातील, असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगरमधी जन आक्रोश मोर्चात बोलत होते.

पुण्यामध्ये पुन्हा एकदा नॅशनल गेम्स होण्यासाठी प्रयत्न करणार; खासदार मुरलीधर मोहोळ 

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राज्यात अनेक ठिकाणी जन आक्रोश मोर्चे निघत आहे. आज छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यासाठी मोर्चा काढण्यात आलाय. या मोर्चाला संबोधित करतांना जरांगे म्हणाले की, हे एक नेटवर्क आहे. या नेटवर्कमध्ये वेगवेगळ्या टीम आहेत. खंडणी मागणारी एक टीम, चोरी करणारी दुसरी टीम, लुटणारी वेगळी टीम आहे. पण यांचा बॉस धनंजय मुंडेच आहे, असं म्हणत मुंडेंवर घणाघाती आरोप केलाय. तसंच, आम्ही जर बिथरलो तर धनंजय मुंडेला जड जाईल, असा इशाराही जरांगेंनी दिला.

‘गावा-गावात कार्यकर्ता तयार करा, येणारा काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा’; अजितदादांनी सांगितली पक्षाची रणनीती 

देशमुख कुटुंबावर जी वेळ आली, ती राज्यातील कोणावरही येऊ नये. भविष्यात जर हे होऊ द्यायचे नसेल तर धनंजय मुंडेंच्या टोळ्या संपवा, असंही जरांगे म्हणाले.

त्या दिवशी राज्य बंद करणार…
जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणातील एकही आरोपी सुटणार नाही असा शब्द दिलाय म्हणून आम्ही शांत आहोत. यातील एकही जण सुटला अन् आमचा घात झाला तर तर मुख्यमंत्र्यांची गाठ ना आमच्याशी आहे. खंडणी आणि खून करणाऱ्यांना सांभाळलं कुणी हे आरोपपत्रात आलंचं पाहिजे, ज्या दिवशी आम्हाला वाटेल की आरोपी सुटतील, त्या दिवशी आम्ही राज्य बंद करू, असा इशारा जरांगेंनी दिला.

संतोष भैय्याला न्याय मिळाल्या शिवाय आपण त्यांच्या कुटुंबियांच्या मागून एक इंच सुद्धा मागे हटणार नाही, असंही ते म्हणाले.

follow us