‘गावा-गावात कार्यकर्ता तयार करा, येणारा काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा’; अजितदादांनी सांगितली पक्षाची रणनीती

  • Written By: Published:
‘गावा-गावात कार्यकर्ता तयार करा, येणारा काळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचा’; अजितदादांनी सांगितली पक्षाची रणनीती

Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सर्वच राजकीय पक्षांनी महापालिका निवडणुकीच्या (Municipal elections) तयारीला सुरूवात केली. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाचे शिर्डीत शिबिर सुरू आहे. या शिबिरात पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना अजित पवार यांनी सूचक विधान केलं. येणारा काळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असं विधान त्यांनी केलं.

सैफ अली खान हल्ला प्रकरण : आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी 

अजितदादांनी सांगितली पक्षाची रणनीती
शिर्डीच्या शिबिरात बोलतांना अजितदादांनी आगामी काळात पक्षाची काय रणनीती असली पाहिजे, यावर भाष्य केलं. ते म्हणाले विधानसभेच्या यशानंतर आपली जबाबदारी वाढली आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवेत. ज्यांना आमदारकी देणे शक्य झालं नाही, त्याना मनपा व जिल्हा परिषदेला त्यांना संधी देऊ. जे-जे इच्छुक आहेत त्यांनी एक जबाबदार कार्यकर्ता निवडला पाहिजे आणि २५ घरावर काम केल पाहिजे. म्हणजे एका घरात ४ मत धरली तर १०० मत मिळतील. प्रभागात प्रत्येक उमेदवाराने ५० कार्यकर्ते तयार केले तर आपण २० हजार मतापर्यत पोहोचू शकतो. प्रत्येकाने १०० मतांपर्यंत पोहोचायच आहे, योग्य नियोजन केलं तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला नक्कीच फायदा होईल असं ते म्हणाले.

“पाया पडून अजितदादांना सांगितलं पहाटेची शपथ घेऊ नका पण..”, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट 

गावा-गावात कार्यकर्ता तयार करा…
पुढं ते म्हणाले, आपण अधिकाधिक तरुणांना पक्षात आणायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, वकील यांना पक्षात आणायचं आहे. राज्यातील प्रत्येक गावात, चौकात पक्षाचा झेंडा लागेल, पक्षाचा बोर्ड लागेल याची काळजी घेतली पाहिजे. गावा-गावात कार्यकर्ता तयार होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. घरातला कार्यकर्ता बाहेर पडतो, त्यावेळी तो एका पक्षात, बायको वेगळ्या पक्षात अन् पोरगा तिसऱ्या पक्षात आणि लेक अपक्ष असं सगळं असतं, हे आपल्या पक्षात व्हायला नको, असं ते म्हणाले.

विधानसभेच्या अनुषंगाने ज्या पधतीने आम्ही दौरे केले, तसेच आता येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगानेही आम्ही दौरे करणार आहोत, असंही ते म्हणाले.

ते म्हणाले की, विधानसभेच्या यशानंतर आपली जबाबदारी वाढली आहे. पक्षात येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. मात्र ज्यांची जनमानसात प्रतिमा मलिन आहे, त्यांना राष्ट्रवादीत नो एंट्री असणार. तसंच ज्यांनी बंड केलं होतं, ते चुकलं-चुकल म्हणून माझ्याकडे येत आहेत. मात्र कुणालाही पक्षात घेणार नाही. त्यांना देखील शिस्त म्हणजे काय हे कळायला हव. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना पुन्हा पक्षात स्थानच नाहीच. त्यांची चूक पदरात घेता येणार नाही, कारण आता पदरही फाटला आहे, असं ते म्हणाले.

ईव्हीएमच्या मुद्द्यावरून विरोधकांवर टीका…
ते म्हणाले, लोकसभेत पराभव झाला आणि विधानसभेत आम्ही यश मिळवले. मात्र, विरोधकांनी त्यांच्या पराभवांचे खापर ईव्हीएम फोडले. ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करून तेफेक नरेटिव्ह पसरवत आहेत, अशी टीका अजितदादांनी निकाल चांगली की, ईव्हीएम चांगले आणि निकाल निराशाजनक लागली की, ईव्हीएम वाईट अशा बोंबा मारायच्या हे विरोधकांचे धोरण आहे, असंही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube