Download App

ठरलं तर, मतदारसंघ अन् उमेदवार ‘या’ दिवशी जाहीर करणार; मनोज जरांगेंची घोषणा

येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत.

Manoj Jarange on Maharashtra Elections : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) महत्वाची घोषणा केली आहे. आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरू यांची एक महत्वाची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections 2024) अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अन्यायाच्या विरोधात आम्ही उभे आहोत. आज आमचं समीकरण पक्कं झालं आहे. आमचं समीकरण एकमतानं पक्क झालं आहे. येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली.

Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनाला विरोध करणाऱ्या बारस्कर यांची गाडी जाळली

बैठकीनंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीबाबत महत्वाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. जरांगे पाटील पुढे म्हणाले, ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यातील एकच राहिल बाकीच्यांनी अर्ज काढायचे आहेत. मराठ्यांनी इथून पुढं आझाद म्हणून जगावं. आता परिवर्तन होणार आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच चाललो आहोत. कधीच जात पाहणार नाही.

आज सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. आज मराठा, दलित आणि मुस्लीम एकत्रित आले आहेत. आम्ही लोकशाहीच्याच मार्गाने चालणार आहोत. तुम्ही ज्या पद्धतीने लोकशाहीप्रमाणे उभे राहिलात तसेच आम्ही देखील उभे राहणार आहोत. येत्या तीन तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

१५०० रुपये देऊन नादी लावता का ?

यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लाडकी बहिण योजनेचं नाव न घेता सरकारवर जोरदार टीका केली. तुम्ही दीड हजार रुपये देऊन नादी लावत आहात का. आता परिवर्तन होणार आहे. आमची सहन करण्याची क्षमता आता संपली आहे. सुपडा साफ करणार म्हणजे करणारच. सोडणार नाही.

दलित-मराठा-मुस्लिम समीकरण जुळलं तर, मनोज जरांगेंचा इशारा, आज धर्मगुरूंसोबत बैठक

आमच्या जनतेला त्रास दिला म्हणून हा उठाव झाला. आम्ही जागांच्या लफड्यात पडणार नाही. आम्ही कु्णाला दादागिरी करणार नाही. तुम्ही उभे राहता तसे आम्ही राहणार नाही. कोण उभा राहिल कोण नाही हे आम्ही ठरवणार आहोत. आचारसंहितेचे नियम पाळून काम करणार आहोत. एखादा गरीब माणूस उभा राहत असेल तर त्याला रोखू नका. तुम्ही मतदारांपर्यंत जा अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

येत्या तीन तारखेला आम्ही मतदारसंघ आणि उमेदवार सांगणार आहोत. त्यानंतर ४ तारखेला अर्ज मागे घेण्यात येतील. ज्यांना अर्ज मागे घेण्यास सांगितलं जाईल त्यांनी अर्ज मागे घ्यायचा आहे. एकच उमेदवार राहिल. बाकीच्यांनी स्टार प्रचारक म्हणून काम करायचं आहे असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता जरांगे पाटील ३ तारखेला काय घोषणा करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us