Manoj Jarange On Ajit Pawar : प्रत्येकाने आपल्या नावात वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लावा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी केलं आहे. तसेच महिलेच्या नावावर घर घेतल्यास सवलत मिळते असंही अजित पवार यांनी सांगितलं. त्यांच्या याच वक्तव्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया देत टोला लगावला आहे. मुलाच्या नावासमोर आईचं नाव लावा असं काही लोक म्हणतात, तर मग आईची जात लावायला काय हरकत आहे? असा सवाल यावेळी जरांगे पाटील (Manoj Jarange)यांनी उपस्थित करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे.
IND vs SA 1st Test Pitch Report : सेंच्युरियनमध्ये कोण बाजी मारणार? काय सांगते आजवरची आकडेवारी
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कुठलही मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाचं नाव त्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव आणि नंतर आडनाव असं लिहण्याची पद्धत होती. आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे. इथून पुढे मुलीचं किंवा मुलाचं नाव त्यानंतर आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि मग आडनाव असं लिहावं लागणार आहे. कारण महिलादेखील समाजातील महत्वाचा घटक असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.
‘CM शिंदे अन् अजितदादांना भाजपची स्क्रिप्ट वाचावीच लागते’; रोहित पवारांची जळजळीत टीका
त्यावर मराठा आंदोलक जरांगे पाटील म्हणाले की, काहींनी हा सुद्धा निर्णय घेतलाय की, मुलाच्या पुढं आईचं नाव लावा आणि नंतर वडिलांचं नाव लावा असं सांगितलंय. पण त्यांच्या हे लक्षात येईना की, आईची जात लावा म्हटलं तर काय दुखतंय असा प्रश्न यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
काहीजण म्हणत आहेत की, आईचं नाव लावा मग त्यांना हे दिसत नाही का की, आईची जातपण लावली पाहिजे. मुलाला आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी. काहींचं तेव्हा तिथं तोंड उघडत नाही, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती दौऱ्यावर होते. त्यावेळी बारामती येथे ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात बोलताना अजितदादांनी राजकीय टोलेबाजी केली. त्याचवेळी बारामतीने आता माझं ऐकावं असे म्हणत शरद पवारांना अप्रत्यक्षपणे टोला देखील लगावला. बरीच वर्षे त्यांचं ऐकलं आता माझं ऐका, असंही यावेळी अजित पवार म्हणाले.
उपमुख्यमंत्री अजितदादांनी बारातमतीत राजकीय टोलेबाजी करताना शासकीय धोरणांवरही टिपणी केली. त्यात, राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढं आईचं नाव लिहावं लागणार असल्याचंही यावेळी त्यांनी जाहीरपणे सांगितलं. त्यावरुन समाजमाध्यमांमधून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. त्याचवेळी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली आहे.