Manoj Jarange News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील थेट मुंबईला (Manoj Jarange Patil) निघाले आहे. आता मुंबईतच उपोषण करणार आहेत. त्यांच्या या आंदोलनच्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवरही जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी आज थेट अंतरवाली सराटी गाठली आणि मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. दोघांनीही माध्यमांसमोरच चर्चा केली. देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करावी. आम्ही लगेच तीन लाख ट्रक काढतो. फडणवीस साहेबांचा बंगला गुलालाने भरून टाकतो असे जरांगे पाटील म्हणाले आहेत.
मराठा आरक्षण आंदोलक (Maratha Reservation) मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन करण्यासाठी उद्या (दि. 27) मुंबईच्या दिशेने निघणार आहे. त्या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. यावेळी जरांगे यांनी मी आजारी मला कधीही काहीही होऊ शकतं असं म्हणत सरकारला भावनिक आवाहन केलं.
ब्रेकिंग : मुंबईतील आंदोलनापूर्वी उच्च न्यायालयाचा जरांगेंना दणका; मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
साबळे आणि जरांगे भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती जरांगे यांनी माध्यमांना दिली. ते म्हणाले की, मराठ्यांची मुलं शिक्षणासाठी झगडत आहेत. तसेच मी त्यांच्यासाठी लढा देत आहे. पण आता माझी तब्येत देखील साथ देत नाही आहे. माझ्या शरीराला शिरा चिटकल्या आहेत. माझ्यामध्ये काहीही राहिलेलं नाही. आम्ही शांततेत आंदोलन करणार आहोत.
मु्ख्यमंत्र्यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधला. मी दादांची भेट घेण्यासाठी आलो होतो. मुंबईत गणेशोत्सव (Mumbai Ganesh Festival) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे मराठा बांधवांचा अडचण व्हायला नको. मुंबईला येताना जो मार्ग आहे त्यात कोणतीही अडचण यायला नको. रस्त्यात ट्रॅफिक लागेल. याआधी मनोज जरांगे नवी मुंबईपर्यंत आले आहेत. आता त्यांचा मुक्काम कुठे असेल, त्यांचा मार्ग कसा असेल याबाबत मी माहिती घेतली आहे.
त्यावर फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे यांनी जरांगे यांना त्यांच्या आंदोलनाच्या मार्गाबाबत निरोप देतो. मला तुमच्या आंदोलनाच्या मार्गाचा मॅप आला आहे. जरांगे यांनी जी काही माहिती दिली. ती मी मुख्यमंत्र्यांना देईन असे राजेंद्र साबळे यांनी सांगितले. मुंबईत गणेशोत्सव (Mumbai Ganesh Festival) मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे गणेशभक्त आणि मराठा बांधव दोघांनाही त्रास होऊ नये असे मी त्यांना सुचवले. मनोजदादांना मी तशी विनंती केली आहे असे राजेंद्र साबळे यांनी सांगितले.
मनोज जरांगेंच्या मोर्चामुळे अहिल्यानगर शहरातील वाहतुकीत बदल; जाणून घ्या, पर्यायी मार्ग..