Download App

Manoj Jarange : ..तर एकाही मंत्र्याला फिरू देणार नाही; जरांगेंचा खणखणीत इशारा

Manoj Jarange : मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील मागील पंधरा दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. आज उपोषणाच्या पंधराव्या दिवशी मोठ्या घडामोडी पाहण्यास मिळाल्या. आज दुपारी ग्रामस्थांशी संवाद साधत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याचा अल्टिमेटम दिला. या एक महिन्यात त्यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. मात्र, तीस दिवस संपल्यानंतर 31 व्या दिवशी राज्यातील एकाही मंत्र्याला महाराष्ट्राच्या सीमेवर फिरू देणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.

जरांगेंकडून सरकारला एक महिना; उपोषण सोडण्यासाठी सीएम, डीसीएम, दोन्ही राजेंनी यावे

आज दुपारी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. मराठा समाजाशी मी गद्दारी करणार नाही. मी सरकारला एक महिन्याची आणखी मुदत देतो. परंतु, महिन्यानंतर समितीचा अहवाल काहीही आला तरी आरक्षण द्यावेच लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तुम्हाला विचारल्याशिवाय मी कोणतंच पाऊल उचलणार नाही. मी तुमच्यापुढे जाणार नाही. मी तुमच्यासाठी जीवाची बाजी लावणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत पहिल्यांदाच बैठक झाली. सर्व पक्षांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा ठराव मंजूर केला. ठरावाची प्रत मला देण्यात आली आहे. मी पारदर्शकपणे काम करतो असे जरांगे म्हणाले. उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजेंनी यावे, असेही जरांगे यांनी सांगितले.

12 ऑक्टोबरला विराट सभा

मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली.  या काळात साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. एक महिन्यानंतर समितीचा अहवाल काहीही आला तरी सरकारला आरक्षण द्यावेच लागेल असे त्यांनी सरकारला ठणकावले. एक महिन्यानंतर विराट सभा घेण्यात येणार असल्याचे जरांगे यांनी यावेळी जाहीर केले.  सभा कुठे होईल याचे ठिकाण मात्र अद्याप निश्चित झालेले नाही.

Maharashtra Politics : शिंदेंनंतर फडणवीसांची विकेट? अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीने वाढली धुसफूस !

.. तोपर्यंत मी माझ्या उंबऱ्याला शिवणारही नाही

समितीचा अहवाल काहीही येऊ द्या, आम्ही मराठ्यांना आरक्षण देणारच, असं सरकारचं म्हणणं आहे. आमरण उपोषणाच्या जागेवर महिनाभर साखळी उपोषण करा, असंही सरकारनं सुचवलं आहे. मी बोललो होतो की मी छाताडावर बसून राहणार तर याचा अर्थ असा झाला. मराठ्यांना आरक्षणाचं प्रमाणपत्र मिळत नाही तोवर मी घरी जाणार नाही. तुम्हाला वाटत असेल की सरकारने जबाबदारी घेतली म्हणून मी घरी जाईन, हे मनातून काढून टाका. मी घरी जाणार नाही. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या उंबऱ्याला शिवणारही नाही, असे मनोज जरांगे (Manoj Jarange) म्हणाले.

Tags

follow us