Download App

मुंबईत आमरण उपोषण अन् गावाकडे ‘गनिमी कावा’, जरांगेंनी दिला कानमंत्र

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून मराठा आरक्षणासाठी मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. मुंबईतील आरक्षणादरम्यान सरकारने काही चुकीचे केलं तर महिलांनी आमदारा आणि खासदारांच्या घरी जाऊन बसायचे. घरी राहिलेल्या महिलांनी देखील आंदोलन करायचे, असे मनोज जरांगे यांनी बीडच्या इशारा सभेतून सांगितले.

ज्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना आरक्षण दिले, जे मागास सिद्ध झाले नाहीत त्यांना आरक्षण दिले. मराठा जात मागास आहे हे सिद्ध झालं आहे. शासकीय नोंदी सापडल्या आहेत तरी मराठ्यांना आरक्षण मिळाले नाही. याचा अर्थ सरकारला मराठा जात संपवायची आहे. सरकारला विनंती आहे की मराठा समाजाला डिवचू नका, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. आज बीडमध्ये जरांगेंची इशारा सभा झाली.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सरकारने शहानपणाची भूमिका घ्यावी. त्या एकट्याचे ऐकून मराठा समाजावर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल. सरकार त्याचं ऐकतंय असं दिसून येतंय. देशातल्या जेवढ्या राज्यात मोठ्या जाती आहेत, त्यांना संपवायचा घाट सरकारने घातलाय. पण एकदा जर मोठा समुदाय खवळला तर शांततेत तुमचा सुफडासाफ होईल. मराठा समजाला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Manoj Jarange : येवल्याचं येडपट ते साऱ्या दुनियाचं; मनोज जरागेंचा छगन भुजबळांवर हल्लाबोल

नवीन पद्धती आणू नका. तुम्ही एकदा अंतरवालीत प्रयोग केलाय. अंतरवालीत केलेल्या प्रयोगाचे फळ तुम्हाला भोगावं लागलंय. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे आरक्षण द्या. त्याच ऐकूण मराठा समाजावर अन्याय केला तर तुम्हाला जड जाईल. मराठा समाजाच्या एकजुटीची ताकद वाया जाऊ देणार नाही. मी ह्यांना मॅनेज होत नाही. मराठा समाजाला ओबीसीतूनचं आरक्षण मिळणार, असे मनोज जरांगे यांनी म्हटले.

मनोज जरांगेंची सर्वात मोठी घोषणा; 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार

आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. त्याच्यात किती दम आहेत हे एकदा बघायचे आहे. आम्ही गप्प बसलो की काड्या करतोय. मराठा आरक्षणाच्या विरोधात कोणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. मग तो कोणीही असू द्या. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे, असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर केला.

Tags

follow us