Download App

मनोज जरांगेंची तब्येत पुन्हा बिघडली; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange Patil Health : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटी (Manoj Jarange Patil) यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा लावून धरला. ते अनेक ठिकाणी सभा घेत आहेत. मराठ्यांना आरक्षणासाठी एकत्र येण्याचं आवाहन करत आहे. मात्र, आता मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्यामुळं आपल्या पाचवा टप्पातील दौरे आणि कार्यक्रम आटोपून जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला रवाना झाले आहेत.

Nitesh Rane : ‘सुधाकर बडगुजर सिर्फ झांकी है, संजय राऊत अभी’..; नितेश राणेंचं चॅलेंज काय? 

मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास ओबीसी नेत्यांनी विरोध केला. त्यामुळं मागील गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील हे नियमत सभा घेत आहे. राज्यभर दौरे करून मराठा समाजाची एकजूट करत आहेत. मात्र, सततचे दौरे, सभा, प्रवास यामुळं जरांगे पाटील यांची प्रकृती पुन्हा खालावली आहे. त्यांना कफ, अशक्तपणा आणि बरगड्यांचा त्रास जाणवत असल्याची माहिती आहे. दरम्यान, त्रास जाणवू लागल्यानं ते पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील गॅलेक्सी रुग्णालयात रवाना झाले आहेत.

Ahmednagar News : गो बॅक गो बॅक मोदी सरकार गो बॅक… भाजपच्या रथ यात्रेला शेतकऱ्यांकडून विरोध

याआधी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांची तब्येत खालावली होती. त्यांचे वजन कमी झाले होते. शिवाय किडना आणि लिव्हवर सुज आले होती. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना आरामाचा सल्ला दिला होता. मात्र, उपचारानंतर जरांगेंनी राज्यव्यापी दौरा करायला सुरूवात केली. मात्र, आता त्यांची प्रकृती खालावली आहे. प्रकृती सुधारणा झाल्यानंतर जरांगे पुन्हा एकदा पुढील आंदोलनाची तयारी करणार आहेत.

२० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. मात्र, सरकारकडून अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी २० जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा केली. जरांगे म्हणाले, राज्य सरकार वेळ वाया घालवून मराठ्यांची फसवणूक केली. आम्हालाही मर्यादा आहेत. आमच्याकडून किती वेळ घेणार? आधी तीन महिने, नंतर चाळीस दिवस आणि आता दोन महिने घेतले. शेवटी आपल्याही काही मर्यादा आहेत. सरकारने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं आता 20 जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण करणार, असं जरांगे म्हणाले.

तर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार आणि इतरांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह याचिका सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली. मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह याचिका न्यायालयाने मान्य केल्याने समाजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती संजय कौल, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि बीआर गवई यांच्यासमोर २४ तारखेला सुनावणी होणार आहे.

Tags

follow us