Manoj Jarange On Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्यावर जोरदार टीका केली. यापूर्वी त्यांनी आरक्षणाच्या मुद्दावरून जरांगेंवर टीका केली. आज तर जरांगेंचा एकेरी उल्लेख करत तुझं खातो का रे, असा सवाल त्यांनी केला. इतकचं नाही तर तुझ्या सारखे सासऱ्याच्या घरी तुकडे मोडीत नाही, अशी टीकाही त्यांनी केला. दरम्यान, यावर आता जरांगे पाटलांनी जोरदार पटलवार केला.
लाठीचार्जनंतर जरांगे घरात जावून झोपले; टोपे अन् रोहित पवारांनी त्यांना मध्यरात्री उपोषणाला बसवले
आज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी भुजबळांनी केलेल्या टीकेविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, राज्यात शांतता नांदू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता त्यांच्याकडे टीका करण्याशिवाय काही उरले नाही. त्यामुळे त्यांनी आमच्यावर कितीही टीका केली तरी आम्ही आमचे ध्येय बदलू देणार नाही. काहीही बोलायचं आणि राज्यात शांतता राहू द्यायची नाही, हे त्याचं धोरण आहे. सासरा-जावई काढायचा प्रश्नच नाही. ते वयाने मोठे आहेत, त्यांना भान ठेवून बोललं पाहिजे. त्यांचाही बायोडेटा आमच्याकडे आहे. पण, मी किती शिकलोय त्यांना काय माहीत? ते खूप शिकले तरी लोकाचं खाल्यानं जेलमध्ये जाऊन आले. त्यामुळं कोण कुणाचं खातोय, त्यावर त्यांनी बोलू नये.
India Vs Australia: भारत-ऑस्ट्रेलिया वर्ल्डकप कोण जिंकणार? थलायवाने केली भविष्यवाणी
जरांगे म्हणाले, तुमच्या शेपटावर आम्ही पाय देत नाही. तुम्ही आमच्या पायात पाय घालू नका. यांना राज्यात अशांतता पाहिजे. म्हणून ते लोकांच्या भावना भडकवण्याच्या प्रयत्नात आहेत, राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून सरकारने यांच्याकडे अधिक लक्ष द्यावं, असंही जरांगे म्हणाले.
मराठा आणि ओबीसी समाज या राज्यात कोणताही वाद होऊ देणार नाही. कारण तेही आमचे भाऊ आहेत. या नेत्यांनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी कितीही प्रयत्न केले तरी मराठ्यांच्या या एकजुटीला तडा जाणार नाही आणि मराठा-ओबीसी वाद होणार नाही.मात्र, आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. तुम्ही कितीही एकत्र या, आम्हाला काहीही फरक पडत नाहीत. आम्ही सुध्दा पन्नास टक्के आहोत, असा इशारा जरांगेनी दिला.