Download App

Manoj Jarange : ‘आरक्षणाचं काय केलं, 17 डिसेंबरपर्यंत सांगा, अन्यथा’… जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम !

Manoj Jarange : आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण हवं आहे. 24 डिसेंबरच्या आत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) दिलं पाहिजे. आरक्षण कसं टिकणार हे देखील राज्य सरकारने स्पष्ट करावे. मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला हे 17 तारखेपर्यंत सांगावं अन्यथा 17 तारखेला आंतरवाली सराटीत होणाऱ्या बैठकीत पुढील दिशा ठरवू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी राज्य सरकारला दिला. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावर काय कार्यवाही केली याचं उत्तर सरकारकडे मागितलं.

जरांगे पाटील म्हणाले, आरक्षणावर काय कार्यवाही केली ते 17 तारखेच्या आत सांगा. ठरल्याप्रमाणं काय कार्यवाही केली ते सांगा, नाहीतर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. आंदोलनाची दिशा ठरली की मग तुमचा आणि आमचा संबंध संपला, अशा शब्दांत त्यांनी इशारा दिला. मला दिलेल्या आश्वासनांची चिठ्ठी जाहीर करु. 24 तारखेपर्यंत सरकारवर विश्वास ठेवणार आहोत. मागासवर्ग आयोगाच्या अडचणी असतील तर त्या सरकारने सोडवल्या पाहिजेत, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

Chhagan Bhujbal : ‘आमची परीक्षा पाहू नका, जातगणना करा ताकदही कळेल’ भुजबळांचा थेट इशारा

24 तारखेपर्यंत मी कुणावरही काहीच बोलणार नाही. त्यानंतर मराठा समाज काय आहे हे सगळ्यांनाच कळेल. 24 तारखेपर्यंत आरक्षण मिळालं नाही तर पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत. सरकारने याआधीच्या पत्रात जे लिहून दिलं होतं त्यानुसार आम्हाला मिळायला हवं. 17 डिसेंबरपर्यंत आम्हाला मराठा आरक्षणासंदर्भात लेखी मिळायला हवं होतं. पण अजून तसं काही मिळालेलं नाही. सरकारने आम्हाला लिहून दिलं होते. पुरावे म्हणून त्याचे व्हिडिओ देखील आमच्याकडे आहेत. 17 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला लेखी मिळालं नाही किंवा आदेश मिळाला नाही तर तिथून पुढं तुमचा आमचा विषय संपला, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला.

 

 

Tags

follow us

वेब स्टोरीज