Download App

तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका, आरक्षण दिलं नाहीतर 113 आमदार पाडणारच, जरांगेंचा फडणवीसांना इशारा

फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. ण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं - जरांगे

  • Written By: Last Updated:

Manoj Jarange : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी ओबीसी (OBC) समाजातून आरक्षण देण्याची मागणी केली. मात्र, अद्याप ही मागणी पूर्ण झाली नाही. त्यामुळं जरांगे पाटील सातत्याने सरकावर टीका करत आहे. आजही जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (Devendra Fadnavis)भाजपवर (BJP) जोरदार टीका केली.

IND VS BAN : मोठी बातमी! बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, ‘या’ स्टार गोलंदाजाला संधी 

मराठा आरक्षण जनजागृती निमित्त आज जरांगे पाटील परळी वैजनाथ येथे आले होते. यावेळी बोलतांना त्यांनी जरांगेंनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. जरांगे म्हणाले की, देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप लावला आहे. त्यांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्याच विरोधात घातले. रोज एक आमदार आमच्या विरोधात बोलत आहे. मात्र हा ट्रॅप रचण्यापेक्षा फडणवीस यांनी गरीब मराठ्यांना आरक्षण द्यावं. पण तुम्ही आरक्षणाला विरोध करू नका. फडणवीसांनी त्यांच्या लोकांना आवरावं, असं जरांगे म्हणाले.

कुटुंब फोडणाऱ्या पक्षाला जाब विचारणार का?, रोहित पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर 

तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही
पुढं ते म्हणाले, तुमची श्रीमंती मराठ्यांसमोर टिकणार नाही. रावणाकडेही श्रीमंती होती, पण तीही टिकू शकली नाही. मराठ्यांसमोर तुमची सत्ता टिकूच शकणार नाही. मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नका. तुम्हाला सुट्टी मिळणार नाही. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात यायचं नाही. आमचं आरक्षण आम्हाला द्या.. मात्र आम्हाला आमचं आरक्षण न दिल्यास पुन्हा एकदा सांगतो, तुमचे 113 आमदार पाडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा जरांगेंनी दिली.

मतदानाच्या दिवशी मी ज्याला सांगेन, त्यालाच मतदान करा, असे आवाहन जरंगे यांनी मराठा बांधवांना केले आहे.

जरांगे म्हणाले की, मला माझ्या समाजापुढे काही दिसत नाही. तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहात, तर मी का असू नये? मला माझ्या समाजाचा अभिमान आहे. मला आंदोलन करण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? या सत्तेसाठी आणि या राजकारण्यांसाठी मी का पाऊल माघे घेऊ? मी मराठा आरक्षण घेऊनच राहणार, असा निर्धार जरांगेंनी केला.

 

 

follow us