कुटुंब फोडणाऱ्या पक्षाला जाब विचारणार का?, रोहित पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर

  • Written By: Published:
कुटुंब फोडणाऱ्या पक्षाला जाब विचारणार का?, रोहित पवारांचं अजितदादांना प्रत्युत्तर

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठं बंड केलं होतं. त्यांनी पक्षावर दावा ठोकल्याने पवार कुटुंबात मोठी फूट पडली. दरम्यान, यावर आता अजितदादांनी बोलतांना मोठं विधान केलं. कुटुंबातील फूट समाज स्वीकारत नाही. मलाही याचा अनुभव आहे, असं विधान अजितदादांनी गडचिलोरी येथील सभेत बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अजितदादांच्या वक्तव्यावर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनीही यावर भाष्य केले आहे.

धक्कादायक! कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, गर्भवतीच्या डोक्यावरही धारदार वार… 

ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना त्याचा जाब विचारण्याची हिंमत अजितदादांमध्ये आहे का? अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

रोहित पवार यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. अजित पवार यांच्या वक्व्याबाबत त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, ज्या पक्षाने कुटुंब फोडलं त्यांना अजित पवार विचारणार आहेत का? की, तुम्ही माझ्याकडून काय करून घेतलं, हे भाजपाला विचारण्याचं धाडस अजित पवारांमध्ये आहे का? मुळात लोकसभा निवडणुकीत लोकांनी अजित पवारांना नाकारलं आहे. त्यामुळे अजित पवारांनी त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी कंपनीला 200 कोटी रुपयांचे कंत्राट दिलं, ती कंपनी लोकांच्या भावनांचा अभ्यास करून नेत्यांच्या तोंडी अशी विधानं येतात, अशी टीका रोहित पवारांनी केली.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने मोडले सर्व विक्रम, जिंकली 29 पदके 

बारामतीला एकदा माझ्याशिवाय दुसरा आमदार मिळाला पाहिजे. मीही आता 65 वर्षांचा झालोय, न मागताही विकास कामं होतायत, तरीही बारामतीकर वेगळा विचार करतात, अशी खंत व्यक्त करत दुसरा आमदार आला की माझी किंमत तुम्हाला कळेल, असं वक्तव्य अजितदादांनी केली. त्याविषयी विचारलं रोहित पवार म्हणाले, अजित पवार असे का बोलले ते मला कळत नाही. एकतर ते भावनिक झाले असावे किंवा त्यांनी लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला असावा, खरंतर विकास महत्वाचा आहे, तसाच विचारसुद्धा महत्वाचा आहे. बारामतीतल्या सुज्ञ आणि स्वाभिमानी मतदारांनी हे दाखवून दिलं. विचार सोडल्यामुळे अजित पवार यांना तिथे नुकसान झालं, असं म्हणावं लागेल, असं रोहित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube