धक्कादायक! कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, गर्भवतीच्या डोक्यावरही धारदार वार…

  • Written By: Published:
धक्कादायक! कर्जतमध्ये एकाच कुटुंबातील तिघांची हत्या, गर्भवतीच्या डोक्यावरही धारदार वार…

Crime News:  रायगड (Raigad) जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील चिकनपाडा गावात एकाच कुटुंबातील तिघांची हत्या (murder) करण्यात आली. मृतांमध्ये पती, पत्नी आणि एका मुलाचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, या हत्येप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी धुळा टेळे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने मोडले सर्व विक्रम, जिंकली 29 पदके 

मदन जैतू पाटील ( वय 35 वर्ष), अनिशा मदन पाटील (वय 30 वर्ष) आणि विनायक मदन पाटील (वय 10 वर्ष) अशी या मृत तिघांची नावे आहेत. रविवारी सकाळी चिकनपाडा गावात घरामागील नाल्यात तिघांचे मृतदेह आढळून आले. तिघांच्याही डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे तिघांचीही हत्या करून मृतदेह नदीपात्रात टाकण्यात आल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ऐन गणेशोत्सवात घडलेल्या हत्या प्रकरणामुळं कर्जत तालुका हादरला आहे.

पुण्यात भाजपला मोठा धक्का! माजी आमदार शरद पवारांच्या गळाला, थेट उमेदवारीच जाहीर 

धक्कादायक बाब म्हणजे, हत्येतील अनिशा ही सात महिन्यांची गर्भवती होती, अशी माहिती समोर आली. अनिशा या आरोग्य विभागात आशा सेविका म्हणून काम करीत होत्या.

पाटील कुटुंबीय गेल्या दहा ते बारा वर्षांपासून या परिसरात राहत होते. आज पहाटे त्यांचे मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात पाठवले. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, नेरळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा तपास सुरू आहे.

दरम्यान, भाऊबंदकीतील जागेच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलल्या जत आहे. मदन पाटील यांच्या वडिलांना बाधून ठेवलेलं घर मदन यांच्या नावावर होते. त्यामुळे वडिलांनी बांधलेल्या घराचा अर्धा भाग आपल्या नावावर करून देण्यात यावा यासाठी मदन यांचा भाऊ हनुमंत हा आपल्या भावासोबत वाद घालतअसे. त्यामुळं पोलिसांनी हनुमंत जैतू पाटील याला संशयित ताब्यात घेतलं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube