पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने मोडले सर्व विक्रम, जिंकली 29 पदके

  • Written By: Published:
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने मोडले सर्व विक्रम, जिंकली 29 पदके

Paris Paralympics 2024 : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये (Paris Paralympics 2024) भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी करत आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहे. भारतीय संघाने पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये एकूण 29 पदके जिंकली आहे. या स्पर्धेत भारतासाठी पहिले पदक अवनी लेखराने (Avani Lekhara) जिंकले तर शेवटचा पदक नवदीपने जिंकले.

भारताने या स्पर्धेत 07 सुवर्ण, 09 रौप्य आणि 13 कांस्यपदके जिंकून पदकतालिकेत 18 व्या स्थानावर आले. टोकियो 2020 पॅरालिम्पिकमध्ये भारताने 19 पदके जिंकली होती. पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताने सर्वात जास्त पदके ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये जिंकली. तर 200 हून अधिक पदके जिंकत चीनने पॅरालिम्पिकमध्ये पुन्हा एकदा वर्चस्व गाजवले.

ट्रॅक आणि ज्युडोमध्ये पदके

ट्रॅक इव्हेंट्समध्ये भारताने शानदार कामगिरी केली आहे. प्रीती पाल हिने महिलांच्या 100 मीटर T35 आणि 200 मीटर T35 प्रकारांमध्ये कांस्यपदक जिंकले. T35 ही श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे ज्यांना हायपरटोनिया, ऍटॅक्सिया आणि ऍथेटोसिस सारखे विकार आहेत. तर ज्युदोमध्ये कपिल परमारने पुरुषांच्या ज्युदो 60kg J1 गटात कांस्यपदक जिंकले. हे पदक ज्युडोमध्ये भारतासाठी पहिले पदक ठरले.

तर दुसरीकडे तिरंदाजी आणि क्लब थ्रोमध्ये हरविंदर सिंग आणि धरमबीर सारख्या खेळाडूंनी भारतासाठी पदके जिंकली. हरविंदर सिंगने तिरंदाजीमध्ये भारताला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

Swiggy मध्ये तब्बल 33 कोटींचा घोटाळा, माजी कर्मचाऱ्यावर आरोप

धरमबीर आणि प्रणव सोरमा यांनी F51 प्रकारात पोडियमवर पोहोचलेल्या क्लब थ्रो स्पर्धेत पहिले आणि दुसरे स्थान मिळवले. याच बरोबर कुमार नितेश बॅडमिंटनमध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. नेमबाज अवनी लेखरा महिलांच्या 10 मीटर एअर रायफलचे विजेतेपद जिंकून दोन वेळा पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेती ठरली आहे.

सावधान, देशात मंकीपॉक्सची एन्ट्री? संशयित रुग्णावर उपचार सुरु

follow us
  • fb
  • instagram
  • youtube